राजकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व युवसिंधु फाउंडेशनचे सागर नाणोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..

▪️उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात होणार बक्षीस वितरणाचा समारंभ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.२५: युवासिंधु फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवसिंधु फाउंडेशनचे सदस्य श्री. सागर सोमकांत नाणोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात सायं. ३:०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या समारंभात सर्वांनी सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. दरम्यान या निबंध स्पर्धेत तीन विषय दिलेले होते. त्यातील पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान’, दुसरा ‘महाराष्ट्राचा मराठी आवाज माननीय बाळासाहेब ठाकरे’ आणि तिसरा ‘आजचा युवा आणि समाजकारण’ या स्पर्धेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.

रत्नागिरी जिल्हा तसेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून भरघोस असे निबंध मिळाले. पण हि स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना नंबर देण्यात आले. तसेच बाकी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. त्या निबंधनामधून मान्यवर परीक्षकांनी या निबंधाचे परीक्षण केलेले आहे आणि त्यातूनच हा निकाल जाहीर केलेला आहे.

निबंध लेखन निकाल..
मोठा गट

१) प्रथम-
कु.साईक्षा विठ्ठल केळजी- (४० गुण)

२) द्वितीय-
तेजेश शिवाजी परब (३८ गुण)

३) तृतीय-
समृद्धी सुशिल नाटेकर (३६ गुण)

४) उत्तेजनार्थ-
कश्मिरा भिकाजी गोठणकर (३५ गुण)

सर्वांचे शिवमय अभिनंदन

निबंध लेखन निकाल..
लहान गट

१) प्रथम-
कु.दुर्वा संतोष पांढरे – (४० गुण)

२) द्वितीय- (विभागून)
श्रद्धा सत्यवान मडव (३९ गुण)

३) तृतीय-
करुणा नारायण मोरजकर (३८ गुण)

४) उत्तेजनार्थ-
अभय रामचंद्र गुरव (३६ गुण)

सर्वांचे शिवमय अभिनंदन
तसेच या स्पर्धेची बक्षीसे वितरण समारंभादिवशी सावंतवाडी नगरपरीषद सभागृहात स्वीकारायची आहेत. तरी सर्व स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे. अशी युवासिंधु फाउंडेशनच्या वतीने सर्व स्पर्धकांना विनंती करण्यात आली आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!