सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशन संस्थेच्यावतीने नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर स्वच्छता मोहीम संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशन संस्थेच्यावतीने रविवारी येथील नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि स्वच्छता निरीक्षक रसिका नाडकर्णी या उपस्थित होत्या. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छता मोहीम याबद्दल श्री. बांदेकर आणि सौ. नाडकर्णी यांनी मुलांचे पालक तसेच प्रशिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी नगरसेवक श्री. बांदेकर यांनी आपले अनुभव तसेच गुरुचे महत्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे आयोजन जबाबदारी आणि शिस्तबद्ध नियोजन संस्थेचे सेन्साई वसंत जाधव, सहकारी प्रशिक्षक दिनेश जाधव, संदेश पंडित, सनी जाधव, योगेश बेळगावकर, वैष्णवी रासम, ऍड. पूजा जाधव यांनी केले. तसेच यावेळी सर्व प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमेप्रमाणे इतर सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात जुडो कराटे या सह सामाजिक एक कार्याची जाण विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. या भावनेतूनच हा स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम आम्ही राबविला अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेन्सॉय वसंत जाधव यांनी यावेळी दिली.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

