राजकीयवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्याला अतुल रावराणेंनी लावला सुरुंग..

▪️वैभववाडी नगरपंचायतीतील तीन माजी नगराध्यक्षासह एकूण सात राणे समर्थक नगरसेवकांचा आज मातोश्रीवर होणार शिवसेनेत पक्षप्रवेश..

▪️अतुल रावराणेंनी केलेल्या राजकीय भूकंपामुळे जिल्ह्याच्या राजकारणात माजली खळबळ; राणे कुटुंबीयांच्या साम्राज्याला बसले जबरदस्त हादरे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.०९: तालुका आणि नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असल्यामुळे खासकरून वैभववाडी शहर हा आमदार नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेना नेते अतुल रावराणेंनी आमदार राणेंच्या या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावल्याने एकाएकी या किल्ल्याची तटबंदी पार उद्ध्वस्त झाली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील सात नगरसेवकांचा आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधुन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. त्यामध्ये तीन माजी नगराध्यक्षाचा समावेश आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील श्री. रवींद्र रावराणे, श्री संजय चव्हाण, सौ. दिपा  दिपक  गजोबार, सौ. संपदा शिवाजी राणे, श्री. रवींद्र तांबे, श्री. संतोष पवार व श्री. स्वप्निल  इस्वलकर या सात नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

येत्या काळात वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर आमदार नितेश राणेंना हा प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. एकंदरीतच अतुल रावराणेंनी केलेल्या या राजकीय भूकंपामुळे राणे कुटुंबियांच्या साम्राज्याला जबरदस्त हादरे बसले असुन जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी वक्तव्य करताना म्हटले होते की, अमित शहांच्या पायगुणाने महराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार. रविवारी केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहांचा सिंधुदुर्गात दौरा देखील झाला. त्यानंतर लगेचच वैभववाडी नगरपंचायतीतील राणे समर्थक सात नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत अतुल रावराणेंनी थेट क्रुतीतुन नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहांचा पायगुण नारायण राणेंनाच नडीला आला की काय अशीच राजकीय परिस्थिती अतुल रावराणेंनी आपल्या एका राजकीय खेळीतून निर्माण केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात अतुल रावराणेंची ओळख ही कट्टर राणेविरोधक अशीच केली जाते. त्यांनी अगदी राजकारणाच्या सुरुवातीपासून राणे कुटुंबीयांविरोधात संघर्ष केला आहे. भाजपमध्ये असताना माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्यामुळे अतुल रावराणेंना भाजपकडून कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणेंविरोधातील उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितेश राणेंनीच भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसत असल्यामुळे दुसरा कुणीही असता तरी राणे कुटुंबीयांशी हातमिळवणी करून त्याने भाजपमध्येच राहणे पसंत केले असते. मात्र, राजकीय फायद्यातोट्याचा कसलाही विचार न करता आपल्याला आयुष्यभर राणे कुटुंबीयांशी राजकीय संघर्ष करायचा आहे, या एकाच तत्वाशी प्रामाणिक राहुन अतुल रावराणे भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले. त्यांनी पदाची कोणतीही अपेक्षा न बाळगता केवळ राणे कुटुंबीयांविरोधात संघर्ष करण्यासाठी कणकवलीतील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणेंना पळता भुई थोडी केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर नाट्य घडले व महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यानच्या काळात शिवसेना सत्तेत असुनही अतुल रावराणे सत्तेच्या परिघापासून काहीसे बाहेर फेकले गेले. अलीकडेच त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रीत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदारपणे कमबँक करताना त्यांनी आमदार नितेश राणेंच्याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची किमया करून दाखवलीय. सुरुवातीपासून शिवसेना हा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो. अतुल रावराणेंचा राणे कुटुंबियांसोबत असलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांनी एकाच फटक्यात वैभववाडी नगरपंचायतीतील सात नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतल्याने कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. अतुल रावराणेंसारख्या लढवय्या नेत्याला पक्षाने जास्तीतजास्त ताकद देऊन राणेंच्या साम्राज्याला आणखीन धक्के द्यायला हवेत, अशीच  मागणी कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य शिवसैनिकांकडून व्यक्त होताना दिसतेय. त्यामुळे अतुल रावराणेंसारख्या दबंग नेत्याने राजकीय भुकंप घडवून राणेंच्या साम्राज्याला हादरे दिल्यानंतर भविष्यात ‘मातोश्री’कडुन बक्षीसी म्हणुन त्यांना कोणती नवी जबाबदारी दिली जाते, याकडेच संपुर्ण जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!