मुळस-हेवाळे पुलासाठी १२ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.०९: मुळस-हेवाळे पुल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी १६ सप्टेंबर २०२० रोजी उपोषण छेडले होते. त्यावेळी तालुक्यातील एका पुढाऱ्याने मध्यस्थी करुन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्यापही त्या ठिकाणी साधी इंचभर वीट लागली नसल्याने ग्रामस्थांनी १२ फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनात दत्ताराम देसाई, सचिन देसाई, उदय जाधव यांच्या सह्या असून हेवाळे, बांबर्डे, घाटिवडे ग्रामस्थ पुन्हा उपोषण छेडणार आहेत. या पुलासाठी नाबार्ड मधुन निधी मंजूर झाल्याच्या चर्चा गेली २ वर्षे असून प्रत्यक्षात काहिही हालचाल झाली नाही. १६ सप्टेंबर २०२० रोजी मुळस-हेवाळे पुलानजिक उपोषण केले असता दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि स्थानिक राजकीय पदाधिकारी यांनी भेट देत काँजवेची दुरुस्ती बाँक्स स्ट्रक्टरच्या माध्यमातून केली जाईल. तसेच २० डिसेंबर २०२० पर्यत कामही सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही काम सुरु न झाल्याने १२ फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा दत्ताराम देसाई, सचिन देसाई, उदय जाधव व हेवाळे, बांबर्डे, घाटिवडे ग्रामस्थांनी दिला आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_