राणेंच्या वैदयकीय महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट होईल; आ. दीपक केसरकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.०७: शासकीय महाविद्यालयासह राणेंच्या वैदयकीय महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट होईल. नव्याने तयार होणाऱ्या डॉक्टरांना इंटर्नशिप घेण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज या ठिकाणी व्यक्त केला. दरम्यान प्रिमीयमच्या नावाखाली सावंतवाडी पालिकेकडुन सुरू असलेली वसूली पुढील निर्णय होईपर्यत थांबविण्याच्या सुचना खुद्द नगरविकास मंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याच बरोबर स्टॉलसाठी आंदोलन करणाऱ्या रवी जाधव यांचे लवकरच पुर्नवसन करू, तसे लेखी पत्र सोमवारी मिळणार आहे, असेही केसरकर म्हणाले. श्री.केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात हॉस्पिटलच्या उद्घाटना निमित्ताने या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी होणारे शासकीय आणि राणेंचे वैदयकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता त्याचा फायदा होणार आहे. तसेच नव्याने होणाऱ्या डॉक्टरांना इंटर्नशिप करण्याची संधी दोन्ही हॉस्पिटल मध्ये मिळणार आहे. ही वस्तूस्थिती आहे. यावेळी केसरकर पुढे म्हणाले, चांगल्या कामाला कधीही शिवसेनेकडुन आडकाठी आणण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या महाविद्यालयाला आवश्यक असलेली परवागनी देवून सहकार्याची भूमिका घेतली. राणेंनी सुध्दा त्यांचे अभिनंदन केले. ही चांगली गोष्ट आहे. बांदा-दोडामार्ग रस्त्यावरुन विरोधकांकडुन तिरडी यात्रेचा इशारा देण्यात आला.या रस्त्यावरुन मायानगची वाहतूक होत असल्यामुळे त्याच दर्जाचा रस्ता होणे गरजेचे आहे. अन्यथा पाच-सहा कोटी रुपये खर्चून आम्ही तात्पुरता रस्ता केला असता. परंतू चांगले काम आणि दहा वर्षापेक्षा अधिक काळ हा रस्ता टिकावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणी आंदोलनाची भूमिका घेणे योग्य नाही.
माजगाव येथे धरण प्रकल्प नव्याने मंजूर करण्यात आला आहे. तसेच सावंतवाडीची नळपाणी योजना दुरूस्त करण्यासाठी ५५ कोटी रुपयाचा निधी लवकरच देण्यात येणार आहे, असे केसरकर म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,अशोक दळवी
आदी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_