मडुरा, सातोसे, सातार्डा, नांगरसडा, कवठणी, किनळे रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी निर्धोक खुला होणार; आमदार दीपक केसरकर यांचे आश्वासन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.०१: सातार्डा येथील उत्तम स्टिल कंपनीशी अद्याप आपली चर्चा झाली नसल्यामुळे उपोषणकर्त्यांना सांगितल्याप्रमाणे लेखी पत्र देता येणार नाही. परंतु तीन महिन्यांची नोटीस दिल्यानंतर कंपनी सुरू न झाल्यास कंपनी महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्याठिकाणी एमआयडीसी सुरू करणार. त्यामुळे सदर रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी निर्धोक खुला होणार असल्याचे आश्वासन, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीला दिले. त्यामुळे ठोस लेखी काहीच मिळाले नसल्याने माऊली रस्ता संघर्ष समितीचा संघर्ष कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मडुरा माऊली मंदिरात आयोजित बैठकीत आमदार श्री. केसरकर बोलत होते. यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, समितीचे जगन्नाथ पंडित, भिकाजी धुरी, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरू गवंडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, पाडलोस माजी सरपंच सुभाष करमळकर तसेच बाळू गावडे, तात्या शेर्लेकर, उदय पारिपत्त्ये, आनंद परब, उल्हास परब, श्रीकृष्ण भोगले, चेअरमन संतोष परब, दाजी सातार्डेकर, प्रकाश वालावलकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने स्थानिकांना विश्वासात न घेता सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीला हस्तांतरीत केलेला मुळचा जुना रस्ता मडुरा, सातोसे, सातार्डा, नांगरसडा, कवठणी, किनळे कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कंपनीने पर्यायी काढलेल्या रस्त्याला कोकण रेल्वेची हरकत असल्याने भविष्यात येथून ये-जा करणाऱ्या हजारो युवकांसाठी रस्ताच उपलब्ध राहणार नसल्याने जुना रस्ता कायम ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली होती. परंतु माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आले.
पेळपवाडी रस्ता वादात मध्यस्ती पेळपवाडीकडे जाणार्या रस्त्यासंदर्भात वाडीतील ग्रामस्थांनी आ. दीपक केसरकर यांची भेट घेत समस्या मांडली. वाडीकडे जाणार्या दोनही रस्त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार फंडातून दोन्ही रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी देण्याचे आश्वासन आ. केसरकर यांनी दिले.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_