सावंतवाडीत १० दिवसांचा होणार जनता कर्फ्यू
*सावंतवाडी-:* तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सावंतवाडी शहरात १० दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यास सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी एकमताने संमती दिली असल्याने दिनांक ६ मे पासून १५ मे पर्यंत तालुक्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आज आमदार दिपक केसरकर आणि प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरात १० दिवस जनता कर्फ्यु लावण्याबाबत सर्वाचे एकमत होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरातील सर्व पक्षाचे लोक प्रतिनिधी , पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तम पाटील, सावंतवाडीच्या डी. वाय. एसपी. रोहिनी साळुंखे , शहरातील प्रमुख व्यापारी आदी उपस्थित होते. यावेळी ६ मे पासून १५ मे पर्यंत शहरात जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला असून, या जनता कर्फ्यु ला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शहरात कडक बंद असणार असून, तालुक्यातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन रोहिनी साळुंखे यांनी केले आहे. परंतु या काळात मेडिकल सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.