कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी बँक ऑफ इंडिया शाखा माणगाव येथील उद्धट हिंदी भाषिक व्यवस्थापकांना शिकविले मराठीचे धडे..

▪️जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या कडून शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना ‘मराठी अक्षरांची ओळख’ पुस्तकांची भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०६: तालुक्यातील माणगांव पंचक्रोशीची माणगाव बँक ऑफ इंडिया शाखा माणगाव बाजारपेठेत असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत श्री. धीरज परब यांनी मनसे शिष्टमंडळासह थेट बँकेत धडक देत हिंदी भाषिक मॅनेजर आणि पब्लिक रिलेशन ऑफिसर ग्रामीण भागातील लोकांशी सौजन्याने वागत नाहीत, बँकेचे व्यवहार मराठीतच व्हावेत, कर्ज प्रकरणे, शासकीय लाभाच्या योजना राबविताना होणारा विलंब, बचत गटाच्या संबंधित कागदपत्रे अशा अनेक तक्रारींचा बँक शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना जाब विचारला.

याबाबत स्टाफ मीटिंग घेऊन या सुधारणा तात्काळ कराव्यात. जनतेशी सौजन्याने वागावे. पुन्हा अशा तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेऊ असा सज्जड इशारा श्री. धीरज परब यांनी दिला.

दरम्यान श्री. धीरज परब यांच्या कडून मराठी शिकण्याकरिता मराठी अक्षरे ओळख आणि उजळणी पुस्तके शाखा व्यवस्थापक गौरव राज यांना भेट देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, महाराष्ट्र सैनिक सागर सावंत, सुशांत परब, प्रथमेश धुरी, सिद्धेश पराब, शेखर गायचोर आदी उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!