प्रचितगडाच्या जीवघेण्या शिडीची आमदार शेखर निकम यांनी घेतली दखल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०६: चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगड हा स्वराज्यातील एक अजिंक्य गड या गडावर शत्रू पोहचणे सोडाच जाण्याचा कधी विचारही करु शकला नसेल असा हा दुर्गम गड महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशाच्या विविध भागातील गिर्यारोहक आणि पर्यटक प्रचितगड पाहण्यासाठी येत असतात. मात्र, सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यात गडावर नेणाऱ्या शिडीची दुरावस्था झाल्यामुळे ती जीवघेणी ठरत असल्याचे वृत्त सामनाने प्रसिध्द करताच चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या वृत्ताची दखल घेत शिडीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सामना जवळ बोलतांना सांगितले.
प्रचितगडावर नेणारी ही शिडी दोन टोकांना जोडण्याचे काम करते. पूर्वी येथे दगडी जीना होता. मात्र, त्याच्या पायऱ्या ढासळल्यामुळे अनेक वर्षे गडावर जाताच येत नव्हते. अखेरीस इतिहास प्रेमींनी अथक प्रयत्नांनंतर गडावर जाण्यासाठी शिडी बसविली आणि गिर्यारोहक तसेच पर्यटकांसह हजारो शिवप्रेमी प्रचितगडावर जावू लागले. गेल्या काही वर्षात मात्र उन पाऊस आणि वारा यामुळे ही शिडी गंजू लागली आणि एक एक करत नेमक्या सुरुवातीच्याच सहा पायऱ्या तुटून दरीत पडल्या. शिडीने जात असतांना ती कमालीची हलते, त्यामुळे एकावेळी एकाच व्यक्तीला शिडीवरुन जाता येते. खालच्या बाजूस प्रचंड खोल दरी असल्यामुळे कमकुवत हृदयाची व्यक्ती शिडीवरुन जावूच शकणार नाही. सद्यस्थितीत पायऱ्या मोडून पडलेल्या असतांनाच शिवप्रेमी या धोकादायक शिडीवरुन गडावर जा ये करत असून हा प्रकार जीवघेणा ठरु शकतो.
सामनाने याची दखल घेऊन धोकादायक शिडीच्या छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. धोकादायक शिडीवरुन दुर्गप्रेमी खाली येतांना सदर छायाचित्रात दिसत आहेत. येथे एखादी गंभीर घटना घडू शकते हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभागाने लक्ष घालावे असे सामनाच्या वृत्तात नमूद करण्यात आले होते. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेऊन आपण शिडीच्या दुरुस्तीसाठी अथवा नवीन शिडीच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सामना जवळ बोलतांना सांगितले. याबाबत पुरातत्त्व विभागाजवळ देखील संपर्क साधण्यात येणार आहे .
याबाबत शृंगारपूर येथील ग्रामस्थांसोबत आणि या गावातून वाटाडे म्हणून गडावर जाणाऱ्या युवकांसोबत लवकरच एका बैठकीचेही आयोजन करणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. या बैठकीत प्रचितगडावरील शिडीच्या दुरुस्ती अथवा नव्याने शिडी बसवण्याबाबत चर्चा आणि नियोजन केले जाणार आहे. सद्यस्थितीत शिडीची आणि गडावर जाणाऱ्या वाटेची काय स्थिती आहे? याची देखील सविस्तर माहिती आमदार शेखर निकम यांनी सामना प्रतिनिधी कडून घेतली . दरम्यान प्रचितगडावर जाणाऱ्या शिडीची दुरावस्था झाल्याचे सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्याबद्दल सामनाचे आणि या वृत्ताची दखल घेऊन शिडीसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा करणाऱ्या आमदार शेखर निकम यांचे शृंगारपूर येथील ग्रामस्थ विनोद म्हस्के, विनायक म्हस्के, संगमेश्वर येथील दुर्गप्रेमी सुशांत कोळवणकर, फणसवणे येथील सत्यवान विचारे आदींनी सामनासह आमदार शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

