रामपूर रुग्णालय दर्जोन्नतीसाठी सिव्हिलचे पथक सकारात्मक..
▪️आ. भास्करराव जाधव यांनी पत्राद्वारे केली होती मागणी..
▪️ताबडतोब शासनाकडे प्रस्ताव पाठविणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०२: गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासह या विभागाच्या संचालकांकडे केली होती. त्याची कार्यवाही सुरू झाली असून आज शासकीय रुग्णालय, रत्नागिरीच्या डॉक्टरांच्या पथकाने रामपूर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी हे आरोग्य केंद्र अत्यंत योग्य असल्याचे मत या पथकाचे झाले असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आम्ही पाठविणार आहोत, असे या पथकातील काही डॉक्टरांनी सांगितले.
रामपूर येथील आरोग्य केंद्राचे नुकतेच रू. २.५० कोटी इतके खर्चून नुतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभी आहे. हे आरोग्य केंद्र प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग गुहागर ते चिपळूण या मार्गावर गुहागर व चिपळूण या दोन्ही तालुक्यांच्या मध्यावर आहे. या आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी दोन्ही तालुक्यातील रूग्णांना उपचारासाठी चिपळूण येथील कामथे या रूग्णालयात जाण्यासाठी सुमारे गुहागर येथून ६० कि.मी. चा प्रवास व रामपूर भागातील रूग्णांना सुमारे २५ किमीचा प्रवास करावा लागतो. परंतू रामपूर या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळाल्यास पंचक्रोशी तसेच गुहागर तालुक्यातील अनेक रूग्णांना याचा फायदा होईल व प्रवास वेळेत बचत झाल्याने रूग्णांना तातडीचे उपचार मिळतील, अशा आशयाचे पत्र मतदारसंघाचे आमदार श्री. जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना दिले होते.
या पत्राची दखल घेऊन तरी रामपूर या ठिकाणच्या आरोग्य केंद्रास ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश राज्य शासनाकडून जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांना देण्यात आले. त्यानुसार तेथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आज प्रत्यक्ष पाहणी केली.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_


महोदय
आपण केलेलं रामापूर रुग्णालयाचे काम फार स्तुत्यस्पद आहे. या तुमच्या कामगिरी मुळे नक्कीच आम्हा पंचक्रोशी तील रहिवाशी्यांना त्याचा फायदा होईल.
आणखी एका कामा कडे मी आपलें लक्ष वेधू इच्छितो मी राहणार मुक्काम पोस्ट बोरगांव तालुका चिपळूण. आमच्या गावातून एक नदी वाहते आणि तिचेच पाणी आम्ही नळ योजनेने संपूर्ण गावाला वर्ष भर पुरवतो पण काही हातभट्टी दारू वाल्यानी नदीचे पाणी दूषित केले आहे तेच पाणी पिऊन गुरे आजारी पडत आहेत आणि प्रामुख्याने नदीचे पावित्र्य जपले जात नाही.
माफ करा हा प्रश्न तुमच्या फुडे मंडतो आहे या प्रश्नाला आपण नक्कीच वाचा फोडून तो तडीस न्याल अशी आशा करतो.
वरील विनंतीला मन देऊन लगेच आपण कार्यवाही केलीत आणि हातभट्टी ची दारू वर धाड टाकल्या बद्दल आम्ही आपले लाख लाख ऋणी आहोत.