आ.भास्करराव जाधव यांचे शेतकरी बांधव व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१८: प्रचंड प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आणि शेतकरी वर्ग कधी नव्हे एवढ्या फार मोठ्या संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने उभी शेती, कापलेली शेती, कापून शेतामध्ये साठवून ठेवलेली अडवी-उडवी शेतीसुध्दा डोळ्यादेखत वाहून गेली आहे. याची तातडीने दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत व त्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरूवात केलेली आहे. आपल्याकडे ज्यावेळी शेती गर्भामध्ये येते त्याचवेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे भात किंवा नाचणी यांच्या लोंबींवर किंवा कणसांवर दाणे दिसत असले तरी ते पोचे आहेत, याचाही विचार पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यास मी सांगितले आहे. मी सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की, ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. या कठिण व अस्मानी संकटात आपला बळीराजा पुरता उध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठिशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण आपापल्या भागांत फिरून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे आणि अधिकचे पंचनामे करून घ्यावेत, जेणेकरून या संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता अधिक सोयीचे होईल. याविषयी मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलत आहेच, परंतु काही अडचणी असल्यास माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी विनंती आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_