कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. रेश्मा तांबे यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : खेड

🎴खेड,दि.०२: तालुक्यात गेली अनेक वर्षे कॉलेज जीवनाच्या विद्यार्थी दशकापासून समाजकारण आणि धार्मिक काम आणि राजकारणात आपले वर्चस्व कायम राखून असलेल्या तरुण वयात आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाची वाघीण सौ. रेश्मा तांबे यांची खेड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निवड  झाली,

नुकतीच तालुका कार्यकारणीची बैठक खेड येथे भरणे नाका बसू हॉटेल मध्ये पार पडली. निवड करतेवेळी युवा नेते कोकण संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ  दादासाहेब मंर्चडे, कोकण जेष्ठ नेते शंकर तांबे, मिलिंद तांबे, खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जाधव, युवक अध्यक्ष विकास धुत्रे, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, खेड शहर अध्यक्ष दीपेश जाधव, आर.पी. येळवे, मिलिंद तांबे, बाळकृष्ण देवलेकर,  गोपीनाथ जाधव, युवा नेते गणेश शिर्के आदी उपस्थित होते.

सौ. तांबे यांच्या निवडीमुळे तालुक्यात महिलांमध्ये उत्साही व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेश्मा तांबे यांची खेड तालुका मध्ये महिला बचत गट च्या माध्यमातून  सर्वसामान्य जनतेच्या कणखर नेतृत्व महिला नेत्या म्हणून ओळख आहे. आता पर्यँत त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून पद भूषविली आहेत व योग्य प्रकारे पदाचा वापर करून न्याय मिळवून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्ष संघटनेले त्यांची दखल घेऊन तालुकाची खेड महीला प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम, दुर्लक्षित भागातील तळागाळातील महिला पर्यँत महिला सक्षमीकरण मूलभूत करण्यासाठी पायाभूत नागरी सेवा सुविधा तसेच विविध शासकीय योजना उपक्रम प्रभाविपणे पोचविण्याचे काम पक्ष माध्यमातून करणार आहे. महिलांना अडीअडचणी मध्ये निस्वार्थीपणे मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच लोकहितवर काम करण्याचा हेतू असून त्यावर जास्त प्रमाणात भर आहे. यांच्या या निवडीबद्दल खेड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व स्थरावरून व मान्यवर यांच्या कडून अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देत आहेत.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!