कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’पाककला स्पर्धेत प्रणिता गवंडे प्रथम’

*🛑’पाककला स्पर्धेत प्रणिता गवंडे प्रथम’*

 

*🛑जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मळगाव येथील खानोलकर वाचन मंदिरतर्फे आयोजन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेमध्ये प्रणिता परशुराम गवंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पाककला स्पर्धेला व एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाला महिलांचा व स्पर्धकाचा’ उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून मुलांसाठी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिलांसाठी गायन स्पर्धा, पावसाळी कविता वाचन आदी कार्यक्रम घेतले जात असतात. यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राधिका रुपेश कातळकर यांनी दुसरा व अमृता सुहास खडपकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सुविधा जयशंभो सावंत व वैभवी विजय खडपकर यांना उत्तेजनार्थ वस्तू रूपाने बक्षीसे व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सदरची बक्षीसे ‘महालक्ष्मी एंटरप्रायझेस’, बांदाचे प्रवीण शिरसाट व हॅवल्स कंपनीचे ऋषीकेश ठाकूर यांनी पुरस्कृत केली होती. कार्यक्रमाचे उदघाटन वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर, प्रायोजक उज्ज्वला यशवंतराव खानविलकर / पटेकर तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिनल बाबली तेली तसेच परीक्षक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मळगाव गाव मर्यादित या पाककला स्पर्धेत २० महिला स्पर्धकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. इतर सहभागी स्पर्धाकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी सौ. रंजना राजेश तेली यांनी ग्रंथालयाने घेतलेल्या पाककला स्पर्धेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मळगाव गावातील ‘सखी भिशी ग्रुप’ च्या महिलांनी एकत्रित येवून वाचन मंदिराला बहुमोल ग्रंथाची देणगी रूपाने ग्रंथभेट दिली. स्पर्धेचे उत्कृष्टरित्या परीक्षण सुमेधा सुशील सावळ व ज्योती दीपक सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, सूत्रसंचालन व आभार संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!