🛑जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धेत सद्गुरु संगीत विद्यालयाच्या डॉ. मानसी वझे प्रथम….
*🛑जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धेत सद्गुरु संगीत विद्यालयाच्या डॉ. मानसी वझे प्रथम….*
*🛑कणकवलीच्या सौ. राधा कुशे द्वितीय तर सावंतवाडीच्या सौ. अनामिका मेस्त्री ठरल्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त व 8 मार्च रोजी झालेल्या महिला दिनाचे औचित्त्य साधून प्रथम सत्रात खास विवाहित महिलांसाठी जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा व द्वितीय सत्रात सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सवेश नाट्यगीत गायनाचे आयोजन रविवार दि.9 मार्च रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. भावगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ. मानसी वझे, द्वितीय क्रमांक सौ. राधा कुशे, तृतीय क्रमांक सौ अनामिका मेस्त्री यांनी पटकवला तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. मीना उकिडवे, सौ.सोनिया सामंत, सौ.सिद्धी सहस्त्रबुद्धे, सौ.कोमल पावसकर, सौ. पूजा दळवी यांना मिळाले.
भावगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले, याप्रसंगी सौ. राजश्री टिपणीस, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या ऍड. नेवगी, विश्वकर्मा सुतार समाज समिती सावंतवाडीच्या सचिव सौ. अमीदि मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेचे परीक्षण माजी प्राचार्य व ज्येष्ठ कीर्तनकर ह.भ.प. प्रशांत धोंड यांनी केले, सूत्रसंचालन अशा मुळीक यांनी केले तर स्पर्धेसाठी साथसंगत निलेश मेस्त्री, किशोर सावंत, मंगेश मेस्त्री, सिद्धेश सावंत, गोविंद मळगांवकर, तन्वी मेस्त्री, पुरुषोत्तम केळुसकर,मनीष पवार, किरण सिद्धिये, दुर्वा सावंत, भास्कर मेस्त्री, केतकी सावंत यांनी केली.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पै, ज्येष्ठ नाट्यकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर, संगीत अलंकार श्रीराम दीक्षित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये भास्कर मेस्त्री, विलास नाईक, हेमंत गोडकर, प्रथमेश मोरजकर, श्रिया म्हालटकर, अलिशा मेस्त्री, मुग्धा पंतवालावलकर, चिन्मयी मेस्त्री, उमा तिळवे, मानसी वझे, नेहा दळवी,सानिका सासोलकर, रिया मेस्त्री, मधुरा खानोलकर, निधी जोशी, सिद्धी परब, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, केतकी सावंत या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून एका पेक्षा एक सरस सवेश नाट्यपदे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. यांना साथसंगत निलेश मेस्त्री, किशोर सावंत, निरज भोसले, मंगेश मेस्त्री, पुरुषोत्तम केळुसकर यांनी केली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत केले तर संपूर्ण कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था हेमंत मेस्त्री यांनी सांभाळली.
एन. बी. सी. ज्वेलर्स, राऊत कलेक्शन, श्री, गुरुनाथ वासुदेव पोकळे संगीत वादय विक्रेते, म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी, सातेरी मॅचिंग सेंटर, श्री एच बी सावंत, श्री चंद्रकांत घाटे, श्री. केदार म्हसकर, श्री.नितीन धामापुरकर, श्री विलास नाईक श्री. मंगेश चिटणीस, श्री भास्कर मेस्त्री, श्री सोमा सावंत, श्री हेमंत खानोलकर आदींचे कार्यक्रमास आर्थिक पाठबळ लाभले व मंडळाचे सचिव श्री वैभव केंकरे, उपाध्यक्षा सौ उत्कर्षा मेस्त्री व सौ. आशा मुळीक यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले तर कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शिवराज पाटणकर, श्रीपाद चोडणकर, मंजिरी धोपेश्वरकर, मानसी भोसले, कामगार कल्याण केंद्र कुडाळ च्या केंद्रप्रमुख सुष्मिता नाईक, गायत्री देशपांडे, सुधीर धुमे, अर्चना वझे, वैभवी पुराणिक, डॉ. अभिजीत वझे, मिलन मुतालिक, माजी क्रीडा सभापती उमाकांत वारंग, श्री चिन्मय रानडे यांच्या सह सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

