पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे जाहीर सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.२७: कोकणातील चित्रकथी या पारंपरिक लोककलेचे जतन करीत तिला नवसंजीवनी देणार्या पिंगुळी येथील ठाकर समाजातील कलातपस्वी श्री परशुराम गंगावणे यांना प्रतिष्ठेचा आणि मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षण संस्थेच्या वतीने शालेय मुलांच्या हस्ते व चेअरमन उमेश गाळवणकर व दैनिक तरुण भारतचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थित शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना परशुराम गंगावणे म्हणाले की “फळाची अपेक्षा न करता कलेची पूजा करण्याच्या इराद्याने चित्रकथी ची म्हणजेच कळसूत्री बाहुल्यांची कला गावागावात, सण-समारंभात, राज्या-परराज्यात नेली. घरची प्रचंड गरिबी असतानाही या कलेची साधना केली .लोकांची चेष्टा कुचेष्टा सहन केली; पण प्रयत्न सोडले नाहीत. त्यावेळी मनात वाटत होतं एक ना एक दिवस आमची, आमच्या ठाकर समाजाची ही पारंपरिक कला देशापरदेशात जाईल त्यातून” ठाकर आदिवासी कला अकादमी म्युझियम आणि आर्ट गॅलरी ची स्थापना केली” एक कला ग्राम उभे केले. अनेक चित्रकथी संकलित-संग्रहित केल्या. त्याची शासन दरबारी दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला. मात्र पुरस्कारासाठी माझे कार्य नव्हतेच कधी. तरीसुद्धा पुरस्कार मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. हे इथल्या जनतेच्या प्रेमामुळेच होऊ शकलं. हा पुरस्कार माझा नसून सर्व सिंधुदुर्ग वासियांचा, माझ्यावर आमच्यावर प्रेम करणाऱ्या कलाप्रेमींचा आहे . आणि पुरस्कारा प्राप्त झाल्या नंतर चा हा माझा पहिला सत्कार आहे तो नेहमीच माझ्या स्मरणात राहील.असे सांगत ते या सत्काराने भारावून गेले . अन् भाऊक झाले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र चेतन गंगावणे होते .त्यांनी गंगावणे कुटुंबीयांतर्फे सर्वांना धन्यवाद दिले.
विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स चे नियम पाळून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व थाटात भव्य पटांगणावर व देशभक्तीपर कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या कार्यक्रमानी सादर करण्यात आला. यावेळी समाजातील विविध मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणावर उपस्थित होते. यावेळच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बर्वे, भावना प्रभू यांनी केले. उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे, प्रीतम वालावलकर, प्रणित पालव, योगेश येरम यांच्या कल्पकतेतून बॅ.नाथ पै क्रीडांगणाच्या व स्टेजवर एक भव्य देखावा उभा करण्यात आलेला होता.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

