डॉ.हर्षल शिंदे यांच्या श्री विश्वसोम आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे शानदार उद्घाटन संपन्न..
▪️विविध स्तरातील मान्यवरांच्या शुभेच्छा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२७: येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, चिपळूण पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. हर्षल सुधीर शिंदे यांनी एमडी आयुर्वेद ही पदवी प्राप्त केली असून त्यांच्या श्री विश्वसोम आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते,तर दिपप्रज्वलन आमदार शेखर निकम सर यांच्या हस्ते तर ग्रंथपूजन डॉ हर्षल शिंदे यांच्या हस्ते करून करण्यात आला. या वेळी राज्याचे माजी मंत्री, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम सर,जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार डॉ विनय नातू,माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम,माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम,समाजकल्याण सभापती उमेश सकपाळ,ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, सौ. सुजाता शिंदे, भूषण शिंदे, सुधीर शिंदे यांच्या मातोश्री आदी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत डॉ. हर्षल शिंदे यांनी केले.
प्रास्ताविक करताना हर्षल शिंदे यांनी आपण आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कायमस्वरूपी मोफत सल्ला देऊ, असे जाहीर केले.तसेच त्यांनी यावेळी आयुर्वेदाचे महत्व आणि सद्यस्थिती याबाबत माहिती सांगितली. माजी आमदार रमेश कदम व आमदार शेखर निकम यांनी फुकटच्या दिलेल्या सल्ल्याची किंमत रुग्णाला राहत नाही. त्यामुळे माफक दरात आयुर्वेदीय उपचार डॉ. हर्षल शिंदे यांनी करावेत, असा सल्ला दिला. आमदार भास्करशेठ जाधव यांनी सुधीर शिंदे यांनी आजोबांपासून समाजसेवेचा वारसा जपला आहे. याच भावनेतून डॉ. हर्षल शिंदेही रुग्णांची सेवा करतील, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण अर्बन बँक संचालक सतीश खेडेकर, नगरसेवक कबीर कादरी, शिवसेनेच्या जयश्रीताई चितळे आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. हर्षल शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जुनेद परकार, नगरसेविका सफा गोठे,संजीवनी शिगवण,सुरेय्या फकीर,संजीवनी घेवडेकर,स्वाती दांडेकर,राष्ट्रवादीचे नगरसेवक सभापती बिलाल पालकर,नगरसेवक अविनाश केळसकर,करामत मिठागरी,महंमद फकीर,स्वच्छता सभापती शशिकांत मोदी, आरपीआयचे राजुभाई जाधव, श्रीकृष्ण खेडेकर, अर्बन बँक चेअरमन राधिका पाथरे, संचालक बाबूशेठ तांबे, मोहनशेठ मिरगल, निहार गुढेकर,निलेश भुरण, आजी-माजी नगरसेवक, सहकार, साहित्य, आरोग्य, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले तर आभार सुधीरशेठ शिंदे यांनी मानले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_