कुडाळशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ.नाथ पै पुण्यतिथी व संस्था स्थापनादिन संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१९: “लोकशाहीचा नम्र सेवक, जनतेचा सहृदयी कैवारी म्हणजे  बॅ.नाथ पै. आजच्या तरूण पिढीने त्यांचे नुसते जीवन चरित्र वाचले तरी त्यातून त्यांना मार्गदर्शक ठरतील अशा विचारांचा खजिना त्यांना मिळेल.” असे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी काढले. ते बॅ.नाथ पै शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित बॅ.नाथ पै -५०वी पुण्यतिथी आणि संस्था वर्धापन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते  त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “नाथ पै यांचे नाव असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकत आहात. हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या नावाला साजेशे आपले भविष्यातले कार्य-कर्तृत्व दिसू द्या.”असे सांगत विविध शाखा-अभ्यासक्रमानी बहरत असलेल्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वाटचालीस व चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, बॅरिस्टर नाथ पै यांच्या नात आदिती पै व कुटुंबातील मंडळी-शैलेश पै,अद्वैत पै, मीना पै ,कमलताई परुळेकर, अॅड. देवदत्त परूळेकर, मंगल परुळेकर, अमर‌सेन सावंत, सुधाकर तांडेल, जयप्रकाश चमणकर ,दीपक नाईक, संजय वेतुरेकर, उमेश गाळवणकर, अरुण मर्गज, परेश धावडे इत्यादी उपस्थित होते.

सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व बॅ.नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या आतिथ्यशीलतिचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांपैकी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी “बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव ८०वर्षांनंतरही आज समाजात आदराने घेतले जाते. त्यांच्या पश्चात त्यांच्या अमोघ वाणीचा, जनसामान्यांसाठी केल्या गेलेल्या अलौकिक कार्याचे आज स्मरण केले जाते. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या महानपणाची पोचपावती आहे. आपल्या मातीत जन्मलेल्या माणूस जगभरामध्ये आपल्या कर्तृत्वाने आदरास पात्र झालेला आहे. ही नाथ कुटुंबीयांनी आपणा सर्वास दिलेली एक मोठी देणगी आहे. त्या अमोल देणगीचे, त्यांच्या विचारांचे आपण जतन करूया आणि हे जतन करण्याचं कार्य बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांना आपण बळ देऊया. असे सांगत यांना श्रद्धांजली अर्पण केली व शिक्षण संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कमलताई परुळेकर यांनी “कोणत्याही माणसांचे दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचले की, ते आपल्या परीने दूर करणारा देवदूत म्हणजे नाथ पै होय. कोकण रेल्वेच्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवणारा दृष्टा लोकनेता” अशा शब्दात नाथ पै  यांचे वर्णन करत “इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद  मानणाऱ्या नाथ पै यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम आजच्या विद्यार्थ्यांनी व तरुण पिढीने हाती घेतले पाहिजे. नाथ पै यांचे विचार त्यांचं चारित्र्य त्यांचा अभ्यासूपणा त्यांची विद्वत्ता याचा काही अंशाने जरी स्वीकार आपण केला तर ती त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. असे सांगत संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जयप्रकाश चमणकर यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर कोकणी माणसांसाठी आपल्या विचारधारेतून, सर्वसामान्य बद्दलचा कळवळा जिवंत ठेवण्याचे, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नाथ पै यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी आपल्या आदर्शाचा आपल्या मूल्ययुक्त विचारांचा ठसा उमटवला असा सर्वसामान्यांचा कैवारी म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होय. मतदारांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा लाडका लोकनेता म्हणजे नाथ पै होय. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारी माणसं जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या लोकनेत्यांचे अस्तित्व दृष्टिआड होणार नाही”. असे सांगत एका महान व्यक्तीच्या नावाने शिक्षण संस्था चालविणार्‍या उमेश गाळवणकर यांची व त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नाथ पै यांच्या कुटुंबातील त्यांच्या विचारांचे वारसदार शैलेश पै यांनी नाथ पै यांच्यावरील कोकणवासीयांचे प्रेम पाहून आपण भारावून गेल्याचे सांगत नाथ पै हे जे नाव आहे. त्या नावाचा त्यांच्या विचारांचा मागोवा घेत सन्मान करा. असे सांगत जे नाथ पै कोकणी जनतेच्या गळ्यातले ताईत बनले होते. अशा नाथ पै यांच्या कुटुंबातील आपण सदस्य आहोत. याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगतात सर्वांना धन्यवाद दिले.

बॅ. नाथ पै या पुस्तकाच्या लेखिका त्यांच्या नात आदिती पै यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या विचाराला चालना देणारी शिक्षण संस्था- ,समता व शिक्षण हे नाथ यांचे तत्व, विचार रुजवण्याचे काम करणारी शिक्षण संस्था, नर्सिंग कॉलेज व इतर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विचार आणि व्यक्तिमत्व विकासाल चालन देण्याचं अमोल कार्य करणारी संस्था म्हणून बॅ.नाथ शिक्षण संस्थेचे मुक्तकंठाने कौतुक केले.

देवदत्त परूळेकर यांनी “राजकारणात सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्रभूत मानून ज्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होय, आणि यांचा वारसा जोपासणारी, सामाजिक बांधिलकी ने काम करणारी शिक्षण संस्था बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कौतुक केले व जीवनात व्यक्तिमत्व घडणीसाठी वाचनाचे महत्त्व प्रतिपादन करत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संजय वेतुरेकर यांनी” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले “या सुवचनचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाथ पै होय. कृती आणि युक्ती यांचा जीवनात सुमेळ साधून ज्याने समाजकारणासाठी राजकारण केले ते नाथ आजच्या पिढीसाठी एक आदर्शवत उदाहरण ठरावे. असे सांगून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नाथ पै यांच्या कार्यामध्ये ज्यांनी त्यावेळीं मोलाची साथ दिली. त्या कुटुंबातील दिपक नाईक यांनी “खासदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाथ पै होत. सौम्य भाषेत आपली बाजू परखडपणे मांडण्याचे उत्तम सामर्थ्य असलेला लोकनेता” अशा शब्दात नाथ पै यांचे वर्णन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले व अशा नाथ पै यांच्या विचारांनी भारावलेल्या संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी समाजामध्ये समाजवादी विचारणे भारावून काम करणारे ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत, संस्थेचे सल्लागार डॉ. व्यंकटेश भंडारी, पियुषा प्रभू तेंडुलकर, पल्लवी कामत, विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, यांच्यासहित विविध अभ्यासक्रमाची प्राचार्य शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना प्रभू, ऋचा कशाळीकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी, तर उपस्थितांचे आभार प्रणाली मयेकर यांनी मानले.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!