बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांना शुभेच्छा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०८: जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आव्हाने पेलण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी डॉ. व्यंकटेश भंडारी, प्रा. पल्लवी कामत, कु. पियुषा प्रभूतेंडुलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांची डि.एस.पी. कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये इथला मतदार विभागला गेलेला आहे. तरीसुद्धा राजकीय सामाजिक सलोखा सहसा बिघडविला जात नाही. सामाजिक व देशप्रेमी घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील व सहकार्यशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे. आदरातिथ्यशीलता हा या जिल्ह्याचा विशेष आहे. पार्श्वभूमीवर मात्र इतर राज्यांच्या सीमा, काही गुन्हेगारी अनिष्ट प्रवृत्तींचा सामना करत असताना पोलीस डिपार्टमेंट समोर अनेक आव्हाने उभी आहेत. मात्र, आज पर्यंत अनेक सक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभल्यामुळे त्यांनी या सर्वांवर मात करून सिंधुदुर्ग जिल्हयाची प्रतिमा मलीन होऊ दिली नाही. असेच कार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या शुभेच्छांचे पाठबळ असणे गरजेचे आहे; हे लक्षात घेऊन पोलीस विभागाला सतत सहकार्य करणारे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर अग्रणी असतात. हे त्यांनी या सदिच्छा भेटीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अर्थात या सदिच्छा भेटीबाबत डॉ. दाभाडे यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_


अरे हे पण जुने झाले ना.काम करायला सांगा काम.