कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

कोयना प्रकल्पग्रस्त पोफळीत आजपासून उपोषण सुरू..

▪️मुख्यअभियंता बामणे यांनी प्रसारमाध्यमांना टाळले..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२५: महानिर्मिती कंपनी प्रकल्पग्रस्त यांना सामावून घेण्यासाठी महानिर्मितीसाठी जमीन संपादित केल्याचा दाखला शासनाकडून बंधनकारक करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे कोयना प्रकल्पासाठी जमीन देणारी शेकडो प्रकल्पग्रस्त अडचणीत आले आहेत. ऊर्जा खात्याने ही अट रद्द करावी या मागणीसाठी रत्नागिरी व सातारा येथील प्रकल्पग्रस्त आजपासून पोफळी येथील महानिर्मिती कंपनीच्या गेटसमोर उपोषणला सुरुवात केली. यावेळी महानिर्मिती कंपनीचे मुख्यअभियंता अजय बामणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तर पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, अलोरे माजी सरपंच भाऊ मोहिते, प्रकल्पग्रस्त समिती अद्यक्ष किशोर शिंदे आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दर्शविला.

प्रकल्पग्रस्त यांचा दाखला दोन्ही जिल्हाधिकारी यांचे अधिकाराने देतात. मात्र, याच प्रकल्पग्रस्त यांना महानिर्मिती कंपनी यांनी आपली जमीन संपादित केल्याचे पुरावे मागितले. तांत्रिकदृष्ट्या एक इंचही जमीन संपादित नसताना कंपनी पुरावा कशी मागते हा गंभीर प्रश्न आहे. धरणामुळे प्रकल्प उभा राहिला. हे वारंवार सांगूनही निर्णय होत नाही. यामुळे प्रकल्पग्रस्त यांची थेट भरती झाली. आजच जाचक अटी कशासाठी असा सवाल करत आजपासून प्रकल्पग्रस्त पोफळी येथील महानिर्मिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाली आहे.

याविषयी महानिर्मिती कंपनीचे मुख्यअभियंता अजय बामणे यांचे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!