डिक्री झालेल्या जागेत सत्ताधारी नगरसेवकांसाठी वेगळा न्याय व रवी जाधव यांच्यासाठी वेगळा न्याय ही नगराध्यक्षांची दुटप्पी भुमिका सावंतवाडीकरांची दिशाभूल करण्यासाठीच..
▪️उपोषणकर्ते रवी जाधव यांचा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आरोप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.२५: नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवकांचे दुकान न्यायालयीन डिक्री झालेल्या जागेत असताना, ते अद्याप का काढण्यात आले नाही? तर डिक्री झालेल्या आरोग्य भुवनच्या जागेत पर्मनंट स्टॉल नगराध्यक्षांनी कसे काय हलवलेत? रवी जाधव यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे म्हणणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे उपोषण स्थळावर फिरवून का ठेवले? या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रवी जाधव दिवसरात्र काय-काय करतात हे दिसत असताना, कोणत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार रवी जाधव हे ठणठणीत आहेत हे प्रकृती अस्वस्थ असताना, नगराध्यक्ष बेजबाबदारपणे सांगत आहेत. ज्या स्टॉलसाठी मी आंदोलन करीत आहे, ती जागा न्यायालयीन कक्षेत आहे, त्या जागेची डिक्री झालेली आहे, तर नगराध्यक्षांनी त्या जागेत इतर स्टॉल व पानाचे दुकान कोणत्या आधारे इतर स्टॉलधारकांना लावण्यास दिलेले आहे? तर मटक्याचे स्टॉल देखील डिक्री झालेल्या जागेत नगराध्यक्षांनी कशाच्या आधारावर हलवलेले आहेत? याचा आधी खुलासा नगराध्यक्षांनी करावा. असे मत उपोषणकर्ते रवि जाधव यांनी व्यक्त केले आहे.
परप्रांतियांना टी.आर.सी. मध्ये विनाटेंडर गाळा मिळू शकतो, जुना एस.टी. स्टॉप विशेष बाब म्हणून परप्रांतियांना दिला जावू शकतो, फ्रुटची दुकाने परप्रांतियांना रस्त्यावर लावण्यास दिली जावू शकतात, तर स्थानिक स्वराज्य संस्था असलेली सावंतवाडी नगरपरिषद कोणतीही प्रशासकीय नोटीस न बजावता, नगराध्यक्षांच्या आदेशावर माझे दुकान कार्यालय बंद झाल्यानंतर काढून घेऊन जाते आणि अमानवी कृत्य करुन अमानुषपणे माझे नुकसान करुन, माझा स्टॉल काढण्यासाठी हेकेखोरी करुन, माझ्या पोटावर थेट पाय ठेवण्याचे प्रकार नगराध्यक्ष करतात. याला काय म्हणावे? डिक्री झालेल्या सावंतवाडी नगरपरिषदेची जागा, नगराध्यक्ष कोणत्या हितसंबंधी कारणासाठी अद्यापपर्यंत खाली करुन घेऊ शकलेले नाहीत. याचे उत्तर ते सावंतवाडीकरांना देवू शकतील का? असा सवाल प्रसिध्दी पत्रकाद्वारे रवि जाधव यांनी केला आहे.
त्यांच्याच पक्षाचे सत्ताधारी नगरसेवक डिक्री झालेल्या जागेत आपले भुसारी दुकान चालवित आहेत. त्यांच्यावर कारवाई का करु शकले नाहीत? माझी पाच वर्षांची मुलगी अजान व अज्ञान असताना, ती माझ्यासोबत दिवसरात्र बसून, अनेक प्रश्न मला विचारात असताना, त्या अजान, निरागस, मुलीच्या वेदना सीसीटीव्ही कॅमेन्यातून नगराध्यक्षांना दिसत नाहीत का?
आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षबबन साळगांवकर आदींनी त्याच जागेत मला गेल्या २५ वर्षांत हंगामी काळासाठी दुकान लावण्यासाठी परवानगी दिलेली होती. परंतु संजू परब नगराध्यक्ष झाल्यानंतर द्वेषभावनेने त्या जागेत अजून सात दुकाने असताना, माझे एकमेव दुकान रात्रीच्या वेळी येऊन, मुख्याधिकारी यांचे आदेश नसताना का काढले? याचाही सावंतवाडीकरांनी दुरदृष्टीने विचार करावा.
सावंतवाडी शहरातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता संस्थानकाळापासून असलेली सुमारे ७० टक्के दुकाने ही बेकायदेशीर असल्यामुळे तसेच बाजारपेठेतील अनेक दुकाने ही सुमारे ६०/७० वर्षांपासून वसलेली असल्यामुळे कोणाच्याही व्यवसायावर कारवाई व्हावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा नाही. उलट सावंतवाडी शहरात परप्रांतियांऐवजी स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हीच प्रामाणिक भुमिका ठेवून मी माझे उपोषण सुरु ठेवलेले आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

