चौकुळ येथे एम.एस.सी.आय.टी. सेंटरचे उद्घाटन
*🛑 चौकुळ येथे एम.एस.सी.आय.टी. सेंटरचे उद्घाटन*
*🛑 सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि-६जानेवारी :-*
आजच्या संगणक व इंटरनेटच्या जमान्यात ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा संगणकाची ओळख व्हावी यासाठी या केंद्राची सुरुवात सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत केली. सैनिकी परंपरा असलेल्या चौकुळ गावामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गावातच शिक्षण घेत विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गावातील येणाऱ्या पिढीला सुद्धा भविष्यातील स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी काहीतरी शैक्षणिक दृष्ट्या सुरुवात करणे गरजेचे असल्याने या सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा संगणक कक्ष सुरू केला. यासाठी
आजी माजी विद्यार्थी ,चौकुळ यांच्या सौजन्याने चौकुळ येथे एम एस सी आय टी संगणक कक्ष सुरू करण्यात आला. दि ३ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या संगणक कक्षाचे उद्घाटन चौकुळ ज्युनिअर काॅलेजच्या आवारात करण्यात आले. या संगणक कक्षाचा उपयोग आंबोली, चौकुळ, कुंभवडे, खडपडे या गावातील विद्यार्थ्यांना होणार आहे. या प्रसंगी गावचे जेष्ठ नागरिक हिरुदादा गावडे,सोनूदादा गावडे, गिरीभाई गावडे, विजय तुकाराम गावडे, प्रा. मधुकर गावडे,अरुण गावडे मुंबई ग्रामस्थ संघटनेचे अध्यक्ष शामभाई गावडे, काॅलेज अस्थायी समिती अध्यक्ष रुपेश गावडे, चौकुळ हायस्कूल मुख्याध्यापिका समिक्षा दळवी, प्रा. विजय पाटील, प्रा. राधिका आवटे, प्रा. दिपाली गावडे व संगणक शिक्षिका संस्कृती चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते.
आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा संगणक कक्ष उभा राहीला. तसेच विद्यालयाच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. आजी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा विजय लक्ष्मण गावडे व पदाधिकारी या सर्वांचे मनःपुर्वक आभार रुपेश गावडे यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

