दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा बंदोबस्त करावा – राजू मसुरकर
*🛑दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा बंदोबस्त करावा – राजू मसुरकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि- ०२:-* दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये हत्तींचा कळप तेथील शेती, बागायतीचे मोठे नुकसान करीत आहे. भरवस्तीत येणाऱ्या हत्तींच्या कळपाच्या दहशतीने जीव मुठीत धरून घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त करावा, अन्यथा शासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिला.
हत्तींच्या कळपाच्या दहशतीमुळे दोडामार्ग तालुका ‘भीतीच्या छायेखाली आहे. शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. यासाठी सर्व
पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी राजकारण न करता, एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. हत्तींच्या कळपांना वन विभागाने पकडून त्यांना राखीव जंगलामध्ये सोडावे, अशी मागणी मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडे करावी, असे मसुरकर यांनी म्हटले आहे.
हत्तींच्या हल्ल्यात एखाद्या रहिवाशाचा मृत्यू झाल्यास त्याला शासन जबाबदार राहिल. तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोषी ठरतील. त्यामुळे शासनाने दोडामार्ग तालुक्यातील हत्ती पकड मोहीम राबवून त्यांना राखीव जंगलांमध्ये सोडावे व दोडामार्ग तालुक्यातील रहिवाशांना हत्तींपासून कायमची सुटका मिळवून द्यावी, अशी मागणी मसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

