शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मडुरा, सातोसे, नांगरसडा, सातार्डा, कवठणी, किनळे रस्ता कायमस्वरूपी ठेवा; जिल्हाधिकारी यांना निवेदन

▪️तसे न झाल्यास २६ जानेवारीपासून सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार; जगन्नाथ पंडित

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील मडुरा सातोसे कवठणी  किनळे रस्ता तत्कालीन इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याला लागून  रोणापाल , निगुडे, शेर्ले, कास, पाडलोस किनळे कवठाणी सातोसे सातार्डा हे गाव लागून आहेत. हा रस्ता ६० ते ७० वर्षापासून अस्तित्वात आहे. गेली ४० ते ४५ वर्षे या रस्त्यावरून एस्. टी. सेवा व कदंबा सेवा चालू आहे. १९९६ च्या दरम्यान म्हणजेच साधारणत: २५ वर्षापूर्वी उषा ईस्पात या कंपनीने प्रकल्प उभारणीसाठी सातोसे, सातार्डा या गावात शेत जमीन खरेदी केली. शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना व दशक्रोशीतील (स्थानिकांना) लोकांना रोजगार मिळेल म्हणूक आपल्या जमिनी कवडीमोल किमतीने विकल्या. उषा ईस्पात कंपनीने सदर जमिनीचे सपाटीकरण करताना  हजारो झाडांची कत्तल केली व अवजड वाहने वापरून या जमिनीतून जाणारया इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याची दुर्दशा केली. २ ते ४ वर्षानंतर ती जमीन उषा ईस्पात या कंपनीकडून श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीने प्रकल्प उभारणीसाठी विकत घेतली व आतापर्यंत २० वर्षात प्रकल्प उभारला नाही व भविष्य काळात सुद्धा हा प्रकल्प होण्याची चिन्हे नाहीत .

दरम्यानच्या काळात श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीने विकत घेतलेल्या जमिनीत ६० ते ७० वर्षापासून अस्तित्वात असल्लेला रस्ता इजीमा क्र. ३३ कायमचा बंद करण्यासाठी व  पर्यायी रस्ता करण्यासाठी सातोसे व सातार्डा ग्रामपंचायतीकडे नाहरकत दाखला मागितला व तो दोन्ही ग्रामपंचायतीने लोकांचे हित लक्षात नघेताच तत्काळ विनाविलंब दिला. दिलेला नाहरकत दाखला हा कायदेशी आहे. त्याला ग्रामसभेची मान्यता आहे किंवा नाही तसा ठराव ग्रामसभेत झाला किंवा नाही. सदर ठरावाची नोंद ग्रामपंचायातीच्या दप्तरी आहे किंवा नाही याची खात्री  पंचायत समिती सावंतवाडी . जिल्हापरिषद सिंधुदुर्ग यांनी जरासुद्धा केली नाही व जुना रस्ता इजीमा क्र. ३३ हा श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला हस्तांतरण करून त्याऐवजी पर्यायी रस्ता काढण्याची शिफारस करणारा ठराव  जिल्हापरिषद सिंधुदुर्ग याच्या दिनांक २९/०९/२००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला व महाराष्ट्र शासनाला सादर केला. महाराष्ट्र शासनाने श्री उत्तम स्टिल अँड पॉवर लि. सातार्डा या कंपनीला  काही अटीं व शर्ती घालून रस्ता हस्तांतरण करण्यास व पर्यायी रस्ता करण्यास शासनाने  मान्यता दिली.

जुनाच रस्ता कायम राहावा हि आमची मागणी खूप वर्षापूर्वी पासूनची आहे. यासाठी अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचाकडे आम्ही  पत्रव्यवहार केकेला आहे. यासाठी १५ ऑगस्ट२००८ रोजी उपोषणही करण्यात आले होते. त्यावेळी आम्हाला तुमच्या मागणीचा विचार केला जाईल तुम्हाला विश्वासात घेतले जाईल असे आश्वासनही दिले होते. परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

सदर रस्त्याचे हस्तांतरण श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला करताना आम्हाला पर्यायाने सदर गावातील व गावालगतच्या ग्रामपंचायतीना विश्वासात घेतले नाही. सदर रस्ता गावातील (दशक्रोशीतील) लोकाना प्रवासी वाहतुकीस व ये-जा करण्यास खूपच कमी अंतराचा सोयीस्कर मार्ग आहे.

आमच्या दशाक्रोशीतील (मडूरा सातोसे, सातार्डा, रोणापाल, निगुडे, शेर्ल्रे, कास, पाडलोस, किनळे, कवठणी) ग्रामस्थांच्या बाबतीत घडले आहे. सदर रस्ता हा उपरोक्त गावातील लोकवस्तीतून जात असल्याने  दशक्रोशीतील ग्रामास्थाकरीता हा सोयीस्कर आहे. दशक्रोशीतील नागरिक बाजार-रहाटाकरीता, औषधोपचाराकारीता मोलमजुरी करीता, नोकरी व्यवसायाकरिता, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता बांदा, सावंतवाडी, गोवा राज्यात जावे लागते. किमान वेळेत व किमान खर्चात  ये-जा करण्यासाठी सदर तिन्ही रस्ते अत्यंत उपयुक्त आहेत. सदर रस्ते बंद करण्यात आल्यास त्याचा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होणार असून त्यांचे दैनंदिन जीवन गैरसोयीचे, त्रासाचे व कष्टमय होणारे आहे.

सदर रस्त्यासाठी जो सातोसे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच यांनी नाहरकत दाखला दिलेला आहे. त्यावर सातोसे ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवून तो बेकायदेशीर आहे व असलेला रस्ता कायम ठेवावा म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केलेला असून सदर खटल्याचा क्र. MHSI0२ -००००९९ -२०१४ असा आहे.

परंतु मडूरा सातोसे, सातार्डा, रोणापाल, निगुडे, शेर्ले, कास, पाडलोस, कवठणी, किनळे या गावांना म्हणजे ग्रामपंचायतीना विश्वासात न घेता मडूरा सातोसे, सातार्डा, कवठणी, किनळे रस्ता तत्कालीन इजीमा क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ या रस्त्याचे  हस्तांतरण जिल्हापरिषद सिंधुदुर्ग यांनी श्री उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीला केले व करताना  आम्हाला पर्यायाने सदर गावातील व गावालगतच्या ग्रामपंचायतीना विश्वासात घेतले नाही.

मडूरा सातोसे, सातार्डा, कवठणी, किनळे तत्कालीन मार्ग इजिमा मार्ग क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३ हा रस्ता उप अभियंता (वर्ग -१) जिल्हापरिषद बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी शासन निर्णय क्र./जि.प्र/प्र.१६६ दि. ०७/०२/२०१३ अन्वये देखभाल दुरुस्ती प्रयोजनार्थ प्रजीमा दर्जाचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्यस्तर) यांचेकडील पत्र क्र. उप. अभि/जिप/११४/२०१३ दि.०२/०४/ २०१३ अन्वये हस्तांतरण करण्यात आले आहे. तर उप अभियंता सार्वजिक बांधकाम सावंतवाडी कळविते कि, २.२७४ कि.मी. लांबीचा (सातोसे ते सातार्डा) यातून वगळण्यात आला असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल आम्ही करू शकत नाही. सदर मार्ग हा वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्याची दुरुस्ती व देखभाल कोण करणार?
उपरोक्त पर्यायी रस्त्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यापूर्वी, पंचायत समिती सावंतवाडी, जिल्हापरिषद सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा खातरजमा केलेली नाही. तसेच मडूरा सातोसे, सातार्डा, रोणापाल, निगुडे, शेर्ले, कास, पाडलोस, किनळे, कवठणी गावातील जनमत जाणून घेण्याकरिता कोणत्याही प्रकारची जनसुनावणी सुद्धा घेतलेली नाही. त्यामुळे उपरोक्त पर्यायी रस्त्याचा प्रस्तावास चुकीची व बेकायदेशीर मंजुरी मिळालेली आहे.

जिल्हापरिषद सिंधुदुर्ग याच्या दिनांक २९/०९/२००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये श्री उत्तम स्टिल अँड पॉवर लि. सातार्डा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या कंपनीच्या प्रकल्प क्षेत्राच्या सरहद्दीजवळून जाणाऱ्या पर्यायी रस्त्यास मान्यता दर्शविणारा ठराव  समंत करण्यात आला. तो महाराष्ट्र सरकारची दिशाभूल करणारा आहे. तो रद्द करावा व तशी शिफारस महाराष्ट्र शासनाला करावी व महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.जिपर-२९ (अ ) ०९ /प्र..क्र.३२१ /पंरा -८ दिनांक ०३ नोव्हेंबर २०१०  रद्द करावा व मडूरा सातोसे , सातार्डा, कवठणी, किनळे तत्कालीन मार्ग इजिमा मार्ग क्र. ३३ व आत्ताचा प्रजिमा मार्ग क्र. ६३, ग्रामीण मार्ग (जोड रस्ता) क्र.२८ व नांगरसडा-पेळपवाडी (जोड रस्ता) कायम ठेऊन त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी हि विनंती.

तरी याची दाखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. अन्यथा आम्ही दशक्रोशीतील सर्व सरपंचासहित २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०९ वाजल्यापासून सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत. असे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या निवेदनात जगन्नाथ पंडित यांनी म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!