राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रवी जाधव यांची तब्येत खालावलेल्या स्थितीतही सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच..

▪️उपोषणस्थळी सुनील पेडणेकर यांचे नगराध्यक्षांवर अनेक गंभीर आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी

🎴सावंतवाडी,दि.२३: शहरात एकिकडे परप्रांतीयांचे बेकायदा स्टॉल उभे राहत असताना, गेली १७ वर्षे कर भरून करत असलेल्या स्टॉलला बेकायदेशीर ठरवत सदर स्टॉल सावंतवाडी नगरपालिकेने उध्वस्त केल्याने, ‘पाठीवर मारा, परंतु पोटावर नको’, अशी आर्त विनवणी करत उपोषणाला बसलेल्या रवी जाधव नामक दलित समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकाचे कुटुंबासह सुरू केलेले उपोषण आज सलग तिसऱ्या दिवशीही सावंतवाडी नगरपालिकेसमोर सुरू असून, उपोषणकर्ते रवी जाधव यांची तब्येत खालावली आहे.

या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामवंत व्यक्ती, राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे, ज्यात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना जिल्हा संघटक शब्बीर मणियार, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा अध्यक्ष प्रशांत कोठावळे, माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्यासह सुमारे २३० व्यक्तींचा समावेश आहे.

उपोषणस्थळी उपस्थित असलेले सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर अनेक घणाघाती आरोप केले.

श्री. संजू परब हे नगराध्यक्ष या नात्याने नगरपालिकेचे विश्वस्त असताना, प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार करून बेछूटपणे प्रॉपरटी वाटप करत असल्याचा आरोप श्री. सुनील पेडणेकर यांनी केला आहे.

यापूर्वी नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून व न्यायालयीन मार्गाने डीक्री करून मोकळी केलेली १७ ते १८ दुकाने, लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार करून, परप्रांतीयांना विकल्याचा आरोप करत, याप्रकरणी श्री. संजू परब यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्यासाठी तसेच या गैरव्यवहारात त्यांना सहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी यांना निलंबित करण्यासाठी लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी बोलताना दिले.

याबरोबरच जुना एसटी स्टॉप जागा प्रकरण, नगरवाचनालया नजीकच्या गाळ्याचे प्रकरण, यांचीही चौकशी आपण लावणार असून, नगराध्यक्षपद निवडणूक कालावधीतील दडपलेल्या आत्महत्याप्रकरणाची सी.आय.डी. चौकशीची मागणी आपण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सत्तेत आल्यावर श्री. संजू परब यांनी स्थानिकांना रोजगार देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात रवी जाधव सारख्या स्थानिक दलित युवकाच्या पोटावरच मारण्याचे कृत्य करणाऱ्या संजू परब यांचा निषेध करत, उपोषणकर्त्या श्री. रवी जाधव यांना आपला पाठिंबा असल्याचे उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!