वेळीच ओळखा गर्भाशय मुखाचा कर्करोग; डॉ. धीरज खडकबान
▪️जानेवारी महिना हा गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकतेचा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चिपळूण
🎴चिपळूण,दि.२४: स्त्रियांमधील कर्करोगाची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहचू शकतात. सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढला तर लक्षणं दिसायला लागतात. गर्भाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. त्याचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे सोपे होत असल्याची माहिती चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. धीरज खड़कबान यांनी दिली.
कर्करोग दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. खडकबान यांनी लक्षणे तसेच उपचार पध्दतींविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे, यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हा कॅन्सर ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या इन्फेक्शनमुळे होतो. धुम्रपान करणाऱ्या महिला, शारीरिक संबंध कमी वयात येणे, एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे, जास्त प्रसूती होणे, गर्भरोधक गोळ्या जास्त वर्ष घेणे. ह्याचे निदान नियमित पॅप स्मियर नामक परीक्षणाद्वारे करता येते. या परीक्षणामध्ये सर्विक्सच्या पेशींचा नमुना घेतला जाऊन ह्या पेशी पुढे तपासणीसाठी पाठविल्या जातात.
या कर्करोगाचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पॅप स्मिअर चाचणीत रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हा आजार किंवा इतर काही समस्या आहे का, हे तपासण्यासाठी गर्भाशयाच्या काही पेशी खरवडून काढल्या जातात आणि त्यांना मायक्रोस्कोपखाली तपासले जाते. ३० वर्षाहून अधिक वय असलेल्या तसेच लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. यात एचपीव्हीसाठीही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस डीएनए) चाचणी समाविष्ट असावी. एचआयव्ही संसर्ग, केमोथेरपी किंवा दिर्घकाळासाठी स्टेरॉइड घेणाऱ्या स्त्रिया, अवयव रोपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेणे, आधी गर्भाशयाचा कर्करोग झालेला असल्यास किंवा पॅप स्मिअरमध्ये कर्करोगपूर्व पेशी आढळून आल्यास, धूम्रपान करणाऱ्या किंवा अनेक वर्ष संतती नियमनाच्या गोळ्या घेणाऱ्या, अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध असणाऱ्या अशा स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी वारंवार पॅप स्मिअर चाचणी करावी. पेशींच्या बदल किंवा उत्क्रांतीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा क्रियांमध्ये दुसर्या पॅप चाचणीचा समावेश असू शकतो. वैकल्पिकरित्या, यात “कोलपोस्कोपी” नावाची प्रक्रिया समाविष्ट असू शकते ज्यामध्ये डॉक्टरांनी सूक्ष्मदर्शकासारखे साधन वापरुन आपल्या गर्भाशय ग्रीवाची तपासणी करुन तपासणी केली पाहिजे जेणेकरून निरुपद्रवी किंवा कर्करोगाच्या जखमांचे प्रमाण वाढेल. चिंताजनक बाब आढळल्यास डॉक्टर त्या भागाची बायोप्सी घेईल करतात व त्यानंतर मायक्रोस्कोपद्वारे त्याचे परीक्षण करतात.
गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेणे योग्य ठरते. याकरिता सुरक्षित यौनसंबंध असणे गरजेचे आहे. तसेच दर दोन वर्षांनी पॅप स्मियर टेस्ट करविणे आवश्यक आहे. यामुळे रोगाचे वेळेत निदान करणे सोपे होते. ज्या महिला धूम्रपान करीत असतील, त्यांनी धूम्रपानावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. आपला आहार चौरस असावा. तसेच नियमित व्यायाम करावा.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

