शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली पाणलोट समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी उपोषण..

▪️ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गाव पाणलोटच्या विकास कामापासून वंचित; अध्यक्ष बाळा पालेकर यांचा आरोप

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : आंबोली

🎴आंबोली,दि.२३: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पूर्वी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबवल्या जात होत्या. आंबोली गावासाठी सुमारे आठ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर असून डिसेंबर २०१७ पर्यंत हा प्रकल्प तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात होता. मात्र, या कालावधीत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या  असहकार्यामुळे फक्त एकूण प्रकल्पाच्या चार टक्के निधी खर्च झाला. या व्यतिरिक्त तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत एकूण रकमेच्या ५६ टक्के निधी सविस्तर प्रकल्प अहवालानुसार मंजूर होता. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आंबोली येथे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. परिणामी आंबोली गाव जल व मृद संधारणाच्या कामापासून वंचित राहिला. त्यामुळे बचत गट वैयक्तिक लाभार्थी शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. हा निधी खर्च न झाल्यामुळे उर्वरित नऊ टक्के व दहा टक्के निधी खर्च होऊ शकलेला नाही. त्यानंतर डिसेंबर २०१७ नंतर या प्रकल्पात संजीवनी बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था इन्सुली यांच्याकडे हा प्रकल्प सोपवला गेला. मात्र, सदर संस्थेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे या प्रकल्पातील निधी अखर्चित राहिला आहे. सुमारे आठ वर्षापूर्वी मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्यामुळे आंबोली गावाचे फार मोठे नुकसान झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार तालुका कृषी अधिकारी व संजीवनी ग्रामविकास संस्था जबाबदार असून प्रकल्पाविषयी वेळोवेळी चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे तालुका कृषी अधिकारी संस्थेकडून देण्यात आलेली नाही. सदर प्रकल्पाची मुदत मार्च २०२१ रोजी संपत असून या अगोदर प्रकल्पातील कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र, अधिकारीवर्गाच्या सावळ्या गोंधळामुळे फार मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिल्यामुळे आंबोली गावचे अतोनात नुकसान झाले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न आंबोली ग्रामस्थ उपस्थित करत असून यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी पाणलोट समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा अध्यक्ष बाळा पालेकर यांनी दिला आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!