रोणापाल व मडुरा वासियांवर कोकण रेल्वेकडून अन्याय; जिल्हाधिकारी यांना निवेदन
▪️न्यायासाठी प्रजासत्ताकदिनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.२०: तीन दशकापूर्वी कोकण रेल्वे महामंडळाने प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील जमीन संपादित केली होती. सर्वसाधारणपणे महामंडळामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळणार या भावनेने शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात जमिनी दिल्या. परंतु वारंवार मागणी करूनही आम्हाला न्याय मिळालेला नसल्याचे सांगत कोकण रेल्वेकडून आमच्यावर अन्याय झाला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी प्रजासत्ताकदिनी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा शेतकरी तथा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री.गावडे म्हणाले की, काही कालावधीनंतर महामंडळाने अनेक नियम बदलून आम्हा जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवलेले आहे. एका सामाईक सातबारात पाच कुटुंबधारकांची नावे असून पैकी एकालाच नोकरी मिळेल या अटींमुळे कुटुंबावर अन्याय झाला आहे. ज्या क्षेत्रातून रेल्वे मार्ग गेलेला आहे अशा एकाच मालकाच्या क्षेत्राचे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे तुकडे झालेले आहेत. परंतु मागणी करूनही जाण्या-येण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही. यावर विचारणा केली असता सातबारामध्ये पायवाट किंवा रस्ता नोंद नाही असे ‘कोरे’कडून सांगण्यात येते. एका सातबारामधील एका इसमाला सदर महामंडळाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन नोकरी दिली आणि काही वर्षानंतर इतर भागदारांची तक्रार झाली तर त्यांना ‘रिमुव्ह फ्रॉम ड्युटी’ असा शेरा मारून कामावरून घरी बसविण्यात आल्याचे प्रकार घडल्याचे श्री.गावडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या आहेत अशांवर अन्याय झाला आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रजासत्ताकदिनी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा सुरेश गावडे यांनी प्रशासनास दिला आहे. कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य याबाबतची कुठलीही घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

