आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

सती माध्यमिक विद्यालयात गोविंदराव निकम जयंतीनिमित्त विविध दालनांचे उद्घाटन व पारितोषिक वितरण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२३: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती माध्यमिक विद्यालयात सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.गोविंदराव निकम यांच्या जयंती निमित्त विविध दालनांचे उद्घाटन व विद्यार्थी पारितोषिक वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री. बाबासाहेब भुवड हे होते. कार्यक्रमादरम्यान कार्याध्यक्ष व चिपळूणचे आमदार श्री. शेखर निकम यांनी विविध दालनांना भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्व.गोविंदराव निकम यांचा जन्म १६ जानेवारी व मृत्यू २४ जानेवारी असे दोन्ही दिवस जानेवारी महिन्यातील असल्याने या दोन तारखांच्या दरम्यान विद्यालयात जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मांडण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे व कला प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाअध्यक्ष श्री. बाबासाहेब भुवड यांच्या हस्ते रांगोळी दालन-१ चे संचालक श्री.शांताराम खानविलकर, रांगोळी दालन-२ चे संचालिका श्रीमती आकांक्षा पवार, इंग्रजी शैक्षणिक साधन खोली नं.१, श्री दिनेश शिंदे, खोली नं.२, नवनिर्वाचित ग्रामपंचायत चिंचघरीच्या सदस्या सौ.स्मिता चाळके, खोली नं.३ माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ चाळके व गणित अध्यापन साहित्य प्रदर्शनखोलीचे उद्घाटन श्री. महेश चाळके यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले . इयत्ता १० वी व इ .१२ वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना व इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रखकम देवून गौरविण्यात आले. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र वारे यांनी आपल्या मनोगतात सर्व मान्यवरांचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सती विद्यालय डिजिटल आहेच पण ही शाळा ऑनलाइन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. कोरोना काळात विद्यालयाने शिक्षण थांबविले नाही तर ऑनलाइन, ऑफलाइन, गृहभेटी अशा मार्गाने शिक्षण प्रवाहित ठेवल्याचे सांगून शिकविलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन व्हावे म्हणून चाचणी व प्रथमसत्र परीक्षा घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला व त्यात यश आल्याचे आपल्या मनोगतातून नमूद केले. जेष्ठसंचालक श्री.शांतारामखानविलकर यांनी कामात प्रामाणिकपणा असेल तरकार्य यशस्वीपणे पूर्ण होते. सती विद्यालयाने कोरोना काळात पालकांचा विश्वास मिळविला असल्याचे सांगून शाळांनी नेतृत्व घडविले पाहिजे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. बाबासाहेब भुवड यांनी स्व. गोविंदराव निकमसाहेबांच्या आठवणी सांगितल्या. प्रतिकूल काळात शिक्षणासाठी शाळा उघडणेवत्या चालविणे हे कार्य कठीण होते; पण त्यावर मात करून निकम यांनी खेड्यापाड्यात शाळा निर्माण केल्याचे सांगून ते म्हणाले, या शाळांनी समाज शिक्षणाचा केंद्र झालं पाहिजे हिच निकम साहेबांना आदरांजली असेल. सूत्र संचालन प्रा. राजेंद्र पवार, श्री हातणकर यांनी केले तर आभार कलाशिक्षक श्री. तुकाराम पाटील यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक अमर भाट सर्व शिक्षक व विद्यार्थी कोविड-१९ चे नियम पाळून उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!