शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मी असे कोणते पाप केले, मी स्थानिक, उच्चशिक्षित, असूनही माझा रोजगार नगराध्यक्षांनी हिरावून घेतला..

▪️ परप्रांतीय मांडीवर तर स्थानिकांच्या कंबरेवर लाथ का मारताहेत सत्ताधारी..

▪️ पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका; रवी जाधव यांची कळकळीची विनंती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१९: आई-वडीलांनी काबाड कष्टाने मला दहावीपर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर मिळेल ते काम करून शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या प्रामाणिकपणाची व कष्टाची दखल घेऊन सावंतवाडी बाजारपेठेत मला सिजनेबल व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. सदर व्यवसायाच्या आधारावर मी माझे कुटुंब सांभाळून बी.एड, एम.ए., एम.फिल. पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले. हे करत असताना माझ्या शिक्षणाची दखल घेऊन माझे कौतुक करायचे सोडून सावंतवाडी नगरपालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक नासिर शेख, मनोज नाईक, यांनी आपल्याला उध्वस्त करण्याचे काम केले. मी त्यांना माझ्या पोटावर मारु नका. पाठीवर मारा, अशी विनंती केली. तरीही त्याला न जुमानता परप्रांतीयांचे स्टॉल ठेवून माझा स्टॉल हटवीला. यासाठी हे बेमुदत उपोषण आपण सुरू केले असल्याचे रवी जाधव यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी  बोलताना स्पष्ट केले आहे.

पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका, या पोटावर माझे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. एवढे शिक्षण असून सुद्धा न लाजता माझे कुटुंब चालविण्यासाठी मी वाटेल तो व्यवसाय करत आहे. मात्र, सावंतवाडीतील सत्ताधाऱ्यांनी विशेष करून नगरसेवक नासिर शेख यांनी ‘तू सावंतवाडीत व्यवसाय करून दाखव, तुला जागा मिळणार नाही, येथे धंदा केलास तर तुझे सामान फेकून देईन’ अशी धमकी देऊन नगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव टाकून सणासुदीच्या काळात माझे सामान कचरा गाडी भरून जवळपास दीड लाखाचे नुकसान केले. अद्यापपर्यंत ते मला सामान मिळाले नाही. ते सामान मिळाले असते तर मी माझे पोट भरू शकलो असतो. मात्र, माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पोटावर पाय देण्याचे काम या  पाटेकर देवस्थानच्या भूमीत सत्ताधाऱ्यांनी केले. त्यासाठी आज हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. माझा जीव गेला तरी चालेल, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार. असा निर्धार रवी जाधव यांनी व्यक्त केला आहे.

श्री. जाधव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरू, बावीस फर्नांडिस, यासह रवी जाधव यांच्या परिसरातील नागरिक उपोषणस्थळी दाखल झाले.

सावंतवाडी शहरात एका रात्रीत अनेक बेकायदा स्टाॅल उभे राहतात. ते स्थानिकांचे आहेत की, परप्रांतीयांचे आहेत. याचा अभ्यास सावंतवाडी शहरवासीयांनी करावा. मात्र, मी पोटापाण्यासाठी करत असलेला व्यवसाय माझ्याकडून हिसकावून घेतला जात आहे. मी असे कोणते पाप केले की, मी सावंतवाडीचा नागरिक असून सुद्धा व्यवसाय करू शकत नाही. असा सवाल रवी जाधव यांनी उपस्थित करत. सदरची जागा परत मिळावी म्हणून मी गेले दोन महिने वणवण भटकत आहे. अद्यापही आपल्याला न्याय मिळाला नाही. कोणते पाप केल्यामुळे माझा व्यवसाय हिरावून घेतला गेला. बस स्टॉप ची जागा परप्रांतीयांच्या घशात घातली जाते. न्यायालयाचा निर्णय झालेल्या जागेत पुन्हा दुकाने उभी केली जातात. मग त्या दुकानावर अनाधिकृत म्हणून कारवाई का होत नाही. या प्रश्नांची उत्तरे नगराध्यक्ष संजू परब यांनी द्यायला हवीत. असे रवी जाधव यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना स्पष्ट केले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!