आणखीवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

वैभववाडी पंचायत समितीच्यावतीने पासबुक संकल्पना अंमलात आणलेल्या अरुळे ग्रामपंचायतचा सन्मान..

▪️सिंधुदुर्गात दुसरी तर वैभववाडीत पहिली अभिनव उपक्रम राबवणारी अरुळे ग्रामपंचायत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२३: तालुक्यातील अरुळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर आकारणीसाठी पासबुक संकल्पना अंमलात आणली आहे. त्यांच्या या अभिनव संकल्पनेबाबत वैभववाडी पंचायत समितीच्यावतीने अरुळे ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला आहे.

घरपट्टी, पाणीपट्टीतील ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अरुळे ग्रामपंचायतीने पासबुक संकल्पना अंमलात आणली आहे. अशा प्रकारची संकल्पना राबविणारी अरुळे ही तालुक्यातील पहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत डिसेंबर मध्ये याचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची दखल घेऊन वैभववाडी पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. शिवाय पंचायत समितीच्या मासिक सभेत अभिननंदनाचा ठराव सहमत करण्यात आला. सभापती अक्षता डाफळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते सरपंच उज्वल नारकर, उपसरपंच सुहास जांभळे, ग्रामसेवक प्रशांत जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, हर्षदा हरयाण, सहाय्यक गट विकास अधिकारी शुभदा पाटील, अरुळे ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव कर्ले, सुनयना रावराणे, ज्योती रावराणे, प्रज्ञा जाधव, काशिनाथ सुतार, पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

_*💥कोलगावात दुमदुमणार डबलबारी भजनाचा जंगी सामना..💥*_

_🙏🏻नमस्कार! भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री देव कलेश्वर,श्री देव गजानन,श्री देवी सातेरी यांच्या कृपाशीर्वादाने..✋🏻_

_💫ओंकार संगीत विद्यालय व ओंकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि ग्रामस्थ, मित्रमंडळ कोलगाव आयोजित..⚡_

*🔥२०❌२० डबलबारी भजनाचा जंगी सामना🔥*

*🌈शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता 🕗*

*🌐ठिकाण : कोलगाव ग्रामपंचायत शेजारी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.*

_*🔥बुवा श्री. भालचंद्र केळुसकर🚩*_
श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ, वायरी, तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.
_*पखवाज : श्री. दादा परब*_
_*तबला : श्री. विशाल केळुसकर*_

   _*❎❌❎ यांचे विरुद्ध ❎❌❎*_

_*🔥बुवा श्री. संतोष शितकर🚩*_
श्री देवी सोमजाई प्रसादिक भजन मंडळ, ठाणे-दिवा, रायगड-खरसई.
_*पखवाज : श्री. गौरव पिंगुळकर*_
_*तबला : कु. सर्वेश पांचाळ*_

_*🔥भजन रसिकांनी लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध बुवा श्री. कृष्णा राऊळ यांचे आवाहन🙏🏻*_

*🩸संपर्क ⬇️*
_*📱९४२२५९६९३३*_
_*📱९५४५७९९४६३*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!