कोकण विभागातील आंबा व काजू फळपिकासाठी हॉर्टसॅप योजना
*🛑कोकण विभागातील आंबा व काजू फळपिकासाठी हॉर्टसॅप योजना*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १९:-* महाराष्ट्र शासनामार्फत आंबा व काजू फळपिकांकरीता क्रॉपसॅप योजनेअंतर्गत कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापनसाठी “फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) आंबा व काजू पिक” सन २०२४-२५ हा प्रकल्प कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांमध्ये १ ऑक्टोंबरपासून राबविण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पाचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे.
राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, भारतीय कृषि संशोधन परिषद नवी दिल्ली, कृषि विद्यापीठे, विविध संशोधन केंद्र व कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून योजनेचे काम केले जात आहे. यासाठी किमान ५०० आणि जास्तीत जास्त २००० हेक्टर क्षेत्रासाठी एक सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक गावातील निश्चित प्लॉट व रॅन्डम प्लॉटमधून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी सर्वेक्षण करून पिकांची अवस्था व कीड-रोगांची निरीक्षणे करून अहवाल नोंदवतात. कीड-रोग नियंत्रक कृषि अधिकारी राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र (NCIPM) या संकेतस्थळावर अपलोड करतात. जर कीड-रोग आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषि विद्यापीठामार्फत त्यावर मार्गदर्शक सूचना (सल्ले) पाठविण्यात येतात. त्यानुसार कीड-रोग नियंत्रणाचे उपाय केले जातात. कीड-रोगाचा उद्रेक जास्त असल्यास संबंधित गावामध्ये शास्त्रज्ञ व कृषि विभाग अधिकारी प्रत्यक्ष शेतावर पाहणी करून उपाययोजना प्रात्यक्षिक कृतीद्वारे कसे करावे याबाबत मार्गदर्शन करतात. या प्रकल्पाअंतर्गत कोकण विभागातील १२३८०० हेक्टर आंबा व १४७४६३ हेक्टर काजू पीकाखालील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याकरिता ९३२ कृषि सहाय्यक, १७२ कृषि पर्यवेक्षक व ८६ मंडळ कृषि अधिकारी असे एकूण ११९० कृषि विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत.
शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्रावर शेतीशाळा आयोजित केल्या जातात. कोकण विभागातील आंबा फळपिकासाठी ४० व काजूकरीता १८ शेतीशाळा असून त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचा एक भाग म्हणून आंबा व काजू फळपिकांकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणार्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यांसाठी आंबा व काजू पिकांकरीता एकूण ४ प्रशिक्षणे तालुका कृषि कार्यालय वेंगुर्ला, मणेरी दोडामार्ग, मराठा समाज सभागृह कुडाळ व कृषि चिकित्सालय, नांदगाव येथे घेण्यात आली. या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात मार्गदर्शनासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. अजय मुंज प्रभारी अधिकारी आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर (गिर्ये) व डॉ. गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी (हॉर्टसॅप प्रकल्प) हे उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये आंबा व काजू फळपिकांवरील कीड-रोगांची ओळख, त्यांची निरीक्षणे घेण्याच्या पद्धती, नियंत्रणाच्या उपाययोजना, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन तसेच हवामानातील बदल व अवेळी पावसामुळे उद्रेक करणार्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण कसे करावे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_______________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_