कणकवली येथे २२ रोजी ॲथलेटिक्स स्पर्धा
*🛑कणकवली येथे २२ रोजी ॲथलेटिक्स स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदूर्ग, दि- १९:-* सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालय ॲथलेटिक्स चॅम्पियन व जिल्हास्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी क्रॉस कंट्री स्पर्धा २०२४ कणकवली येथील एस. एस. पी. एम इंजिनिअरिंग कॉलेज येथील मैदानावर २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात प्रथमच जिल्ह्यातील मुला- मुलींच्या ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात विकास व्हावा, या करिता स्पोर्टस् फाऊंडेशन सिंधुदुर्ग- किर्लोसच्यावतीने व सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या संलग्नतेने व एस. एस. पी. एम. इंजिनियरिंग कॉलेज, कणकवली याच्या सहकार्याने ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन मैदानी (अथलेटिक्स) चॅम्पियन स्पर्धा व जिल्हास्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी क्रॉस कंटी स्पर्धा २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी त्याच दिवशी सकाळी ६.३० वाजता स्पर्धकांची उपस्थिती आवश्यक असून स्पर्धा सकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू केली जाणार आहे.
कणकवली येथील एस. एस. पी.एम. इंजिनिअरिंग कॉलेज, नरडवे रोड, येथील मैदानावर स्पर्धा होणार असून या स्पर्धा वयोगट ८/१०/१२/१४/१७/१९ वर्षांखालील मुले-मुली व क्रॉस कंट्री स्पर्धा वयोगट १० ते १ कि. मी., १२ ते २ कि. मी., १४-३ कि. मी., १६- ३ कि. मी., १८-६ कि. मी., ४ कि. मी., २०-८ कि. मी., ६ कि. मी., वर्षांखालील मुले-मुली, खुला गट पुरुष महिला १० कि मी. गटामध्ये स्पर्धेत सहभाग घेता येईल.
सर्व विजयी तीन स्पर्धकांना मेडल व प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच उत्कृष्ट खेळाडूला पारितोषिक देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयीन व गावातील मुला-मुलींना यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम व संघटनेचे अध्यक्ष कल्पना तेंडुलकर यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहिती व प्रवेश अर्ज मिळण्यासाठी ठिकाण रुपेश वाळके, एस. टी. बुक स्टॉल, कणकवली, समीर राऊत (७९००१९७४७५) किंवा सौ. कल्पना (९३५९३९६४५०), तेंडुलकर तेजस घाडीगावकर, स्वप्नील कदम, प्रशांत घाडीगावकर, रोशन सावंत, डी. डी. सावंत, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_