आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 घरात खोदला आठ फुटाचा खड्डा ; हिर्लोक गावात अघोरी कृत्याचा प्रकार..

🛑 पूजेच्या साहित्यासह संशयित पाच जण पोलीसांच्या ताब्यात

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१९:- तालुक्यातील हिर्लोक भागात अघोरी कृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरबळीचा प्रकार असू शकतो अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थां मधून वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात पाच-सहा महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे तीन-चार सदस्य ये-जा करत होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सदर महिला मालवण तालुक्यातील धामापूर येथील असल्याचे चर्चा आहे. बाहेर गावातील या संशयित व्यक्ती त्या बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत असत, विशेष म्हणजे त्या घरात संशयितांनी आठ फुटाचा खड्डाही खोदल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या ठिकाणी पूजेचे साहित्य, दोरे, बाहुली, लिंबू,अबीर, बुका, शेंदूर अशा वस्तू आढळून आल्या आहेत.

याबाबत स्थानिक ग्रामस्थांना संशय आल्याने काही सुज्ञ नागरिकांनी गावातील प्रमुख मंडळींना याची कल्पना दिली. त्यानंतर मंगळवारी याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या बंद घरात एका महिलेसह पाच सदस्य पूजाअर्चा करत असताना आढळून आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पूजेच्या साहित्यासह संशयित तीन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कुडाळ पोलीस स्थानकात आणले. दरम्यान या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्यामुळे प्रमुख पोलीस अधिकाऱी त्या गावात रात्री उशिरा भेट देण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत याबाबतचे कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. एकूणच या घटनेमुळे हिर्लोक गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!