कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार सुरूच.

*🛑सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार सुरूच.*

 

*🛑मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या टोळीकडून इमारतींच्या भाडेपट्टीच्या नावाखाली निधीवर डल्ला.*

 

*🛑डीनची भूमिका संशयास्पद.? सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १७:-* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भ्रष्टाचाराचे जणू कुरणचं बनले असून अधिकारी कर्मचारी सेवा पुरवठादारांशी संगतमत करून मोठया प्रमाणावर शासन निधीवर डल्ला मारत असल्याचे प्रकार उघड होत आहेत.विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी आवश्यकता नसताना भाडेतत्वावर इमारती दाखवून निधी लाटण्याचे प्रकार कर्मचाऱ्यांकडून चालू आहेत.बीएसएनएल इमारत अशाच पद्धतीने रहिवासासाठी राहण्यायोग्य नसताना भाडेकरार करून त्यावर डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च दाखवण्यात आलेला असून भाडेशुल्क,पाणीपट्टी व वीजबिलाच्या नावाखाली लाखोंची देयके लाटण्यात आलेली आहेत. प्रत्यक्षात सदर इमारत राहण्यायोग्य नसल्याने विद्यार्थी वास्तव्यास नसताना देखील लाखो रुपये निधी खर्च दाखवण्यात आलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी संस्थेची इमारत अशाच पद्धतीने आवश्यकता नसताना भाड्याने घेतल्याचे दाखवण्यात आले असून त्याचा कोणताही वापर नसताना सव्वा लाख रुपये भाडे शुल्काच्या नावाखाली लाटण्यात येत आहेत. यांचप्रकारे आहारसेवेसाठी बाह्यसंस्थेमार्फत सेवा देणे चालू असताना कंत्राटी “स्वयंपाकी” पदे भरल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजेच एकीकडे आहारसेवा देणाऱ्या बाह्यस्त संस्थेला लाखोंची देयके अदा करायची तर दुसरीकडे स्वयंपाकी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या नावाखाली अतिरिक्त निधी खर्च करायचा असे भयंकर प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चालू आहेत. या सर्व निविदा आऊटसोड सेवा व अन्य आवश्यक खरेदी संदर्भात खरेदी समितीच्या सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता भ्रष्ट टोळीकडून निधी लाटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. लॉंड्री सेवा, सफाई सेवा, साहित्य दुरुस्ती सेवा आदींमध्ये जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी दिलेला शासकीय निधी भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी वापरला जात आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा भ्रष्टाचाराने अक्षरशः खीळखीळी झाली असून डीनची भूमिका पूर्णपणे संशयास्पद दिसत असून यासंदर्भात येत्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी मेडिकल कॉलेजकडील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा शिवसेना कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!