🛑 युवकांचा ध्यास .. ग्रामीण विकास..
🛑 लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने निवासी शिबिराचे आयोजन
🛑 जि.प.पू. प्राथमिक शाळा खोक्रल येथे २० डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत होणार निवासी शिबिर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१८:- लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गेली २५ वर्षे सातत्याने युवा प्रबोधन लोकशिक्षण, आरोग्य, स्वच्छता या क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आलेला आहेत. ग्रामीण युवक नजरेसमोर ठेऊन आतापर्यंत या विभागाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांत निवासी शिबिरे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रमुख वार्षिक निवासी शिबिर शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ ते गुरुवार दि. २६ डिसेंबर २०२४ या सात दिवसाच्या कालावधीत पूर्ण प्राथमिक शाळा खोक्रल, ता. दोडामार्ग येथे आयोजित केले आहे. या महाविद्यालयाचे हे २४ वे शिबिर असून त्यात विविध समाजोपयोगी प्रकल्प स्थानिक ग्रामस्थ, प्राथमिक शाळा खोक्रल, ता. दोडामार्ग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने राबविले जाणार आहेत.
या निवासी शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ दुपारी २.०० वा.विवेकानंद नाईक (सदस्य, महाविद्यालय विकास समिती तथा, उद्योजक दोडामार्ग) यांच्या हस्ते अभिजित हेगशेटचे (चेअरमन, नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी) यांच्या अध्यक्षतेखाली तर देवेंद्र शेटकर (सरपंच ग्रामपंचायत खोक्रल) राजेंद्र केरकर (सदस्य,महाविद्यालय विकास समिती जेष्ठ पर्यावरण तज्ञ, गोवा)महेश गवस, (माजी सभापदी प. स. दोडामार्ग) ,वैभवी कुलकर्णी (वेदांता फाऊंडेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
◼️ शिबिरातील विशेष प्रकल्प कार्य
- ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडुजी
- पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण
- समाज प्रबोधन
- पर्यावरण जागृती
- व्यसनमुक्ती व आरोग्य संदेश
- आपत्ती व्यवस्थापन
- सांस्कृतिक कला वारसा व दुर्लक्षित पर्यटन ठिकाणे
◼️ शिबिराची प्रमुख उद्दीष्टये
• युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे.
• नेतृत्व गुणांस संधी देणे.
• श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे .
• सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करणे.
• जलसंवर्धन व पर्यावरण याबद्दल जाणीव निर्माण करणे.
• ग्रामीण जीवणाच्या समस्या व उपाययोजनांबद्दल चर्चा करणे.
• बाल संस्कार, आरोग्य यांचा प्रसार करणे.
• सांस्कृतिक कला व वारसा जतन करणे.
तरी या निवासी शिबिरात प्रत्येकाने सहकार्य करावे या सहकार्यातील आम्ही स्वागतच करू असे आवाहन प्राचार्य डॉ. सुभाष सावंत व डॉ.संजय खडपकर, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक योजना विभाग तथा नगरसेवक नगरपंचायत कसई दोडामार्ग यांनी केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

