कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पोलीस अधिक्षक कार्यालयास १५ वॉटर डिस्‍पेन्‍सर मशीनची भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२२: जिल्‍हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्‍या आवाहानास प्रतिसाद देत एका सेवाभावी संस्‍थेने १५ वॉटर डिस्‍पेन्‍सर मशीन जिल्‍हा पोलीस अधिक्षक कार्यालयास भेट दिली. कोरोना काळात अविरत सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाय योजना राबवण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस कल्याण निधीचा भाग म्हणून वस्तु स्वरुपात देणगी देण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे यांनी केले होते.

या मशिनचे वाटप पोलीस अधिक्षक श्री. दाभाडे यांच्या हस्ते आज दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी  करण्यात आले. या मशीन १३ पोलीस ठाण्यांना प्रतेकी एक व सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयास एक व पोलीस अधिक्षक कार्यालय एक असे वितरित करण्यात आले.

सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावताना कोरोना विषाणुच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन गरम, कोमट,व थंड पिण्याच्या पाण्यासाठी या मशिन चा वापर करावा असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “पोलीस अधिक्षक कार्यालयास १५ वॉटर डिस्‍पेन्‍सर मशीनची भेट..

  • subhash piralkar

    साहेबांना सांगा कोरोना नाही आहे म्हणून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!