सिंधुदुर्गातील एकमेव परंपरागत शिराळे गावची गावपळण आजपासून सुरू..
▪️पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह शिराळे वासियांनी थाटला गावाबाहेर जंगलात संसार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२२: सुमारे ४५० वर्षाची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. गावपळणी दरम्यान शिराळेवासिय पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजिकच्या सडुरे गावच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी चिमुरड्यांसह वयोवृध्दही सहभागी झाले आहेत.

वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी शहरापासून सुमारे १५. कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे श्री गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर श्री देव गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासिय गावात परततात.

यावेळी शुक्रवारपासून गावपळणीला सुरूवात झाली आहे. शिराळेवासिय गावपळणी दरम्यान लागणारा धान्य साठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात. व सडुरे गावच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी मोकळ्या माळरानावर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. गावपळणीच्या अगोदर एक दिवस आधी घरामध्ये गोड जेवण किंवा मांसाहारी जेवण करुन बाहेर पडतात. शिराळेवासिय शुक्रवारी सकाळी घरामध्ये जेवण करुन दुपारनंतर घरातून बाहेर पडतात. ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात. तो दिवस गृहीत धरला जात नाही. कारण घरातील चुलीमध्ये अग्नी (विस्तव) असतो. या गावपळणीमध्ये घरातील चिमुकल्यांसह वयोवृध्द सहभागी होतात.

गावपळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा झाडाखाली भरविली जाते. गावात गावपळणी दरम्यान एस. टी. बस सुध्दा जात नाही. गावपळणीला शिराळेवासिय गावाबाहेर निघाले की, जनावरे, पक्षी घेवून बाहेर पडतात. दिवसाही जनावरे सडुरे हद्दीत सोडून दिलेली असतात. पण ती कधीही गावात पळून जात नाहीत. तर संध्याकाळी झोपडी ठिकाणी येतात. गावपळणी दरम्यान लगत असणाऱ्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाण्याचा वापर करतात. ३० ते ३५ झोपड्या असून एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या असतात. त्यामुळे दिवसरात्र हे सर्व लोक एकत्र राहतात. व गावपळणी दरम्यान खेळी मेळीच्या वातावरणात राहून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटत असतात.

श्री गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर दोन दिवसात गावपळण केली जाते. गावपळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कुणीही गावात पाऊल ठेवत नाहीत. कारण या तीन दिवसांच्या कालावधीत श्री गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते. असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे तीन दिवस गावात कोणाचाही आवाज होता कामा नये, त्यामुळे पहिले तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा ग्रामस्थ गावात जाऊन आपले घरदार पाहून येतात. पण गावात राहत नाहीत. तीन दिवसानंतर परत श्री गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत श्री गांगोचा हुकूम होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात.

त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. गावभरणी केल्यानंतर काही दिवसात गावातील एका माळरानावर जत्रौस्तव केला जातो. या जत्रौस्तवामध्ये तालुक्यातील इतर गावातील लोक, पाहुणे, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शिराळेवासियांचा आपल्या श्री देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत तीन दिवसानंतर हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गाव सडुरे गावचा महसुली गाव असून सडुरे शिराळे गावात ८० कुटुंब असून सुमारे सुमारे ३५० लोकसंख्या असणारा गाव आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

