पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या कडून तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व सहकाऱ्यांचा विशेष सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०६: फेब्रुवारी २०१९ मध्ये घडलेल्या विनयभंग आणि चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केल्याबद्दल एसपी राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला.
महिलेला एसटी स्टँडकडे जाणारा जवळचा रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने कणकवली शहरातील मराठा मंडळ रस्त्यालगत मधु सगु कोकरे याने महिलेचा विनयभंग करून महिलेचा मोबाईल आणि रोख रक्कम रु.१ हजार लंपास केली होती. या गुन्ह्याचा योग्य तपासकाम करून भक्कम पूरावे न्यायलयासमोर ठेवल्यामुळे आरोपी कोकरे याचा गुन्हा शाबीत झाला. आरोपी कोकरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी आणि विनयभंगाच्या गुन्ह्याखाली आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी व ५०० रु दंडा ची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ७ दिवस शिक्षा सुनावली आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये हा गुन्हा घडला होता. घटनेनंतर पीडित महिला बेशुद्धावस्थेत होती. आरोपीची माहिती मिळण्यात अडचण येत होती. कणकवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही आरोपीच्या मागावर होते. मात्र आरोपी सापडून येत नव्हता. गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांनी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून हा गुन्हा मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील मधु सगु कोकरे याने केल्याची खबर मिळवली होती.
तत्कालीन प्रोबेशनरी डीवायएसपी कविता फडतरे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनखाली एएसआय बापू खरात यांनी मोठ्या शिताफीने आरोपी मधु सगु कोकरे याच्या असरोंडी येथील राहत्या घरातून मुसक्या आवळल्या होत्या. ए एस आय बापू खरात यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल एसपी दाभाडे यांनी खरात यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत खरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आरोपीला अटक करून सबळ पुरावे मिळवून आरोपीचा गुन्हा शाबीत होण्यासाठी कणकवली पोलिसांनी अथक मेहनत घेतली होती. मालवण पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक तथा कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन एपीआय सोनू ओटवणेकर यांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला होता.तर पुढील तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील यांनी केला होता. कणकवली पोलिसांच्या या सांघिक कामगिरीबद्दल एसपी राजेंद्र दाभाडे यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, हवालदार उत्तम पवार, पोलीस नाईक नजीर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी, कॉन्स्टेबल राकेश कडुलकर, यांचा विशेष सत्कार केला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
टोळीने काही काम केलं आहे का? कणकवलीत आल्यावर काय काय करायला पाहिजे? नुसतं बसून कसं चालणार?माझी तक्रार आहे.कणकवलीत गोंधळ असायचा.याने काय केलं?कसला सत्कार?