आरोग्य

आरोंदा व सातार्डा चेकपोस्टला सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडेनी दिली भेट

 

सावंतवाडी, दि.०९:- तालुक्यातील आरोंदा चेकपोस्ट तसेच सातार्डा चेक पोस्ट येथे काल शनिवारी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे,उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीम.रोहिणी सोलंके, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत,पोलीस ठाणे सावंतवाडी यानी एकत्रितरित्या भेट दिली.गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे कामगार याबाबत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यानी माहिती घेतली .सदर ठिकाणी गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे लोकांची आरोग्य तपासणी करणेबाबत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यानी संबधीत विभागाशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले .त्यानुसार आज दिनांक 09/05/2021 रोजी सकाळी 08:00 वा. पासून सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आरोंदा व सातार्डा या चेकपोस्ट वर गोवा राज्यातून येणारे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारे लोकांची आरोग्य तपासणी तसेच संशयितांची एन्टिजन टेस्ट चालू करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!