मडुरा बाबरवाडीतील एकाचा बैल मृत्यू होऊन तीन दिवस उलटले; लेखी अर्जावर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
▪️सरपंच अनुपस्थित; आक्रमक ग्रामस्थांनी धरले उपसरपंच यांना धारेवर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.२२: मडुरा बाबरवाडी येथील एका ग्रामस्थाचा बैल मृत्यू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटला आहे. बैलाची विल्हेवाट लावण्यासाठी वाडीतील अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास दोन दिवसांपूर्वी लेखी अर्ज देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने बाबरवाडीतील ग्रामस्थांनी आरोग्यासाठी ग्रामपंचायतवर धडक दिली. परंतु सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले अन उपसरपंच विजय वालावलकर यांना धारेवर धरले.
बाबरवाडीतील ग्रामस्थ, अरविंद धुरी, प्रविण धुरी, राजाराम धुरी, चंद्रकांत धुरी यांच्यासह वीस ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदन पुन्हा एकदा ग्रामपंचायतला दिले. भरवस्तीत सदर मृत बैल असून आजूबाजूला तीन पाण्याच्या विहिरी आहेत. बैल मालक व ग्रामपंचायत प्रशासनास कळवूनही त्या बैलाची विल्हेवाट लावली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाड्यात दुर्गंधी वाढत असून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे असे, अर्जात म्हटले आहे.
मृत बैलापासून मानवी जीवनास धोका उदभवू नये याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा यांच्याकडून सदर बैल मालकास त्या मृत बैलाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मडुरा ग्रामपंचायतला लेखी कळविले आहे. उशिरापर्यंत त्या मृत बैलाच्या विल्हेवाट लावण्यासाठी बाबरवाडीतील ग्रामस्थ मडुरा ग्रामपंचायतमध्ये तळ ठोकून बसले होते.
ग्रामस्थांनी सदर अर्जाची प्रत सावंतवाडी तहसीलदार, बांदा आरोग्य विभाग यांना दिली असून बांदा पोलिसांना कल्पना दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_