निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन फुटून १०-१५ दिवस होऊनही अद्यापही दुरुस्त होत नाही – माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप
*🛑निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन फुटून १०-१५ दिवस होऊनही अद्यापही दुरुस्त होत नाही – माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴बांदा, दि- १४:-* निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन गेले १०-१५ दिवस झाले फुटून यासंदर्भात निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सरपंच /ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्रव्यवहार केला. परंतु काल दुरुस्तीसाठी ती घेतली असता पाईप दुसरीकडे आणि खोदकाम तिसरीकडे अशी परिस्थिती निगुडे ग्रामपंचायतीची झालेली आहे. निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव उद्या असून अनेक चाकरमानी, गावात आले असता पाण्याचा तुटवडा झाला आहे. गावातील नागरिक पाणी नसल्यामुळे हैराण झालेले आहे दिनांक ०९ डिसेंबर रोजी गुरुदास गवंडे यांनी ग्रामपंचायतीला सदर पाईपलाईन दुरुस्ती करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्याची दखल घेऊन काल चार दिवसांनी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला परंतु ही लाईन गेले १०-१५ दिवस झाले फुटून यासंदर्भात ग्रामपंचायतीला काही लेणं देणं नाही. एकतर नळ योजनेचे युनिट दर हे प्रति ९ रुपये करण्यात आले आहे असं असतानाही गावात जर मुबलक पाणीपुरवठा लोकांना मिळू शकत नाही तरी नळयोजना काय उपयोगाची त्यामुळे सरपंच, उपसरपंच हे या सर्व गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही वारंवार यासंदर्भात ग्रामसभेत आवाज ही उठवला आहे परंतु ग्रामसभेत काही गोष्टींचे अंमलबजावणी होत नाही पाईप का फुटतात हे ग्रामसभेमध्ये सांगूनही त्या ठिकाणी एअरवॉल बसवण्यास ग्रामपंचायत प्रशासन दिरंगाई का करत आहे? त्यामुळे या ठिकाणी असणारे पंचायत समितीमध्ये प्रशासक हे पूर्णतः ग्रामपंचायतीच्या कारभारावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी असणारे त्यांचे सचिव ग्रामपंचायत अधिकारी हे पण त्याच पद्धतीने मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही गुरुदास गवंडे यांनी केलेला आहे जर पिण्याचे पाण्याची व्यवस्था सरपंच, उपसरपंच करू शकत नाही तर प्रत्येक वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करा असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी दिलेला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

