सावंतवाडीत सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळा
*🛑सावंतवाडीत सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये सावंतवाडी पोलीस ठाणे यांच्यावतीने सावंतवाडीत सायबर गुन्हे, नशामुक्ती, महिला सुरक्षा याविषयी जनजागृती कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेच्या निमित्ताने मार्गदर्शन व प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत आरपीडी हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पोलीस सहभागी झाले होते. कर्मचारी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी बुधवारी सावंतवाडीत आरपीडी हायस्कूल येथे आयोजित केलेल्या सायबर गुन्हे, अमली पदार्थ, डायल ११२ याबाबत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
सायबर गुन्ह्यांपासून फसवणूक कशी टाळावी, ऑनलाईन बँक व्यवहार, ऑनलाईन खरेदी याबाबत फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, सविस्तर मार्गदर्शन केले. महिला सुरक्षा, अमली पदार्थ नशामुक्ती, डायल ११२ याविषयी मार्गदर्शन केले फसवणूक घडत असल्याचे निदर्शनास येत येताच ११२ क्रमांकावर तात्काळ संपर्क करा. तसेच सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर कॉल करा, असे आवाहन यावेळी उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी जनजागृती कार्यशाळेत केले आरपीडी हायस्कूल येथे सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नशामुक्ती संदेशाबाबत जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात तसे जतजागृतीचे फलक देऊन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

