दोडामार्ग नगरपंचायतीतर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम
*🛑दोडामार्ग नगरपंचायतीतर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १४:-* कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकाद्वारे दोडामार्ग शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छीविक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानस्टॉल यांच्यावर प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या अंदाजे १२ किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून दोन हजार रुपये एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक, निवेद कांबळे, करनिरीक्षक लक्ष्मीकांत पिळणकर, संजय शिरोडकर, सिद्धेश शेगले, सुरेश गवस, स्वप्नील सावंत तसेच स्वच्छता दूत पथकाने ही कार्यवाही केली. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास ५०० रु. जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर पाच हजार रु. दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

