कोकणमहाराष्ट्रमालवणशासकीयसिंधुदुर्ग

जि. प. कर्मचारी, पेन्शनर्सचे वेतन रखडले

*🛑जि. प. कर्मचारी, पेन्शनर्सचे वेतन रखडले*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १३:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना अद्यापही नोव्हेंबर महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. प्राप्त माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदभार रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहे. या प्रभारी अधिकाऱ्यांच्या अद्याप पगार मंजुरीवर सह्या नसल्याने हे वेतन रखडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या विलंबामुळे कर्मचारी व पेन्शनरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांसह निवृत्तीवेतनधारकांचेही वेतन दरमहिन्याच्या १ तारखेला अदा होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही कालावधीत हे वेतन कधीही एक तारीखला होत नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांचे तसेच राजपत्रित अधिकारी निवृत्तीवेतनधारकांचे वेतन हे एक तारीख किंवा तत्पूर्वी अदा केले जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांचे व निवृत्तीवेतनधारकांचे वेतन एक तारखेला होणे अपेक्षित आहे. त्यांचे वेतन वेळेत होत नसल्याचे दिसून येते.

दरम्यान, सध्या सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षणासाठी असल्याने हा पदभार रत्नागिरी येथील जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून अद्यापही वेतन पत्रकावर सह्या प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे वेतन अदा झालेले नसल्याचे उत्तर कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात मोठी नाराजी असून याबाबत वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!