आणखीकुडाळराजकीयसिंधुदुर्ग

भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका संघटकपदी प्रथमेश परब यांची वर्णी..

▪️भाजपा युवा मोर्चाच्या आयोजित जिल्हा कार्यकारणी मध्ये देण्यात आले नियुक्ती पत्र..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२२: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी काल रोजी ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुक्याची उर्वरित कुडाळ तालुका युवा मोर्चाची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार प्रदेश सचिव  निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार कुडाळ तालुका संघटकपदी पावशी येथील प्रथमेश परब यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात NSUI कुडाळ तालुका सरचिटणीस पासून ते कुडाळ तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष तसेच स्वाभिमान विद्यार्थी संघटना अश्या विविध पदावर आता पर्यंत काम केले आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना कुडाळ तालुका युवा मोर्चा संघटकपदी निवड करण्यात आली आहे व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री, आनंद शिरवलकर, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!