खेर्डीतील सुखाई परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी एक हजार एक नारळाचा नवस सुखाई देवीच्या चरणी अर्पण करून केला आंनदोत्सव..
▪️गावच्या विकासासाठी सर्वांना चांगली बुद्धी दे! असे घातले आर्जव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२२: नुकत्याच झालेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनेलने एकतर्फी विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. या पॅनलचे प्रमुख जयद्रथ खताते, प्रशांत यादव आदींनी विजयी उमेदवारांसमवेत खेर्डीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचे दर्शन घेऊन विजयासाठी केलेला नवस १ हजार १ नारळ देवीच्या चरणी अर्पण करून गावाच्या विकासासाठी आम्हाला बळ दे! सर्वांना बुध्दि दे! असे साकडे घातले.
खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली की, दोन गट आमने सामने येऊन रणसंग्रामच असतो. या निवडणुकीतदेखील दोन गट समोरासमोर आले होते. दोन्ही गट ग्रामदेवता श्री सुखाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करतात. यानुसार सुखाई परिवर्तन पॅनल प्रमुखांसह उमेदवार व ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेण्याबरोबरच उमेदवारांना विजयी करण्यासाठी साकडे घातले होते. यानंतर जो प्रचार झाला तो सर्वश्रुत आहे. यानंतर खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदंत खताते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शशिकांत कासार आदी पुरस्कृत सुखाई परिवर्तन पॅनलच्या ११ उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवित विरोधकांवर मात मिळविली. तर खेर्डी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी सुखाई परिवर्तन पॅनल प्रमुखांसह उमेदवार व ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेऊन विजयासाठी १ हजार १ नारळाचा नवस केला होता. श्री सुखाई देवीचा आशीर्वाद व मतदारांचा पाठिंबा या जोरावर सुखाई परिवर्तन पॅनेलने खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ उमेदवारांनी विजय मिळवित खेर्डी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्याचे समोर आले आहे. यामुळे सुखाई परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी शुक्रवारी श्री सुखाई देवीचे दर्शन घेण्याबरोबरच विजयासाठी केलेला १ हजार १ नारळ देवीच्या चरणी अर्पण करून नवस फेडला आहे. यावी गावाच्या विकासासाठी आम्हाला बळ दे असे साकडे घालण्यात आले पेढे वाटून विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी परिवर्तन पॅनल प्रमुख जयंद्रथ खताते यांच्यासह या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले प्रशांत यादव, कमलाकर शेंबेकर, माजी सरपंच जयश्री खताते, विजयी उमेदवार विनोद भुरण, प्रकाश पाथरूड, विजय शिर्के, अभिजित खताते, सचिन मोहिते, वृंदा दाते, वैशाली मोरे, अश्विनी पंडित, सुगंधा माळी, सुप्रिया उतेकर, अपर्णा दाते तसेच ग्रामस्थ अनंत भुरण, आत्माराम भुरण, शांताराम भुरण, रामचंद्र भुरण, मंदार भुरण, काशिनाथ दाते, सुनील गुरव, प्रदीप भुरण, तुकाराम दाते,अनंत गुरव, प्रकाश खताते, बाळू शिंदे, प्रियांका भुरण, संजना भुरण, सुधीर ठसाळे, विवेक दाते, सर्वेश दाते, संजय दाते, , अरविंद दाते, सुमित चिले, जयवंत भुरण, अमोल भोसले, श्रीधर भुरण, संकेत चिले, राकेश भुरण, साहिल चिले, बाळा दाते, वृषाली खताते, शुभम खताते, पुजारी , आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_