कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

पेंडूरचा त्रैवार्षिक मांड उत्सव १० जानेवारीपासून

*🛑 पेंडूरचा त्रैवार्षिक मांड उत्सव १० जानेवारीपासून*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०५:-* ऐतिहासीक परंपरा लाभलेला मालवण तालुक्यातील पेंडुर गावचा १४ दिवस भरविला जाणारा जुगाई देवीचा मांड उत्सव यावर्षी १० ते २३ जानेवारी या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री देव वेताळ, देवी सातेरी, रवळनाथ, पावणाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट, पेंडुरने दिली. सुमारे ३०० वर्षाची परंपरा लाभलेला मांड उत्सव हा पेंडुरचे ग्रामदैवत देव वेताळाची बहीण देवी जुगाईचा असून एक वर्षाआड स्वतः देव वेताळ हे आपल्या बहिणीला १४ दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतात. देवी जुगाई १४ दिवस माहेरी राहते आणि तिच्या या माहेरपणाचा काळ म्हणजेच मांड उत्सव होय. जसा बारा वर्षानी कुंभमेळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्याचप्रमाणे पेंडुर गावात देव वेताळ, देवी सातेरी आणि देवी जुगाईच्या कृपेने तब्बल १४ दिवसांचा कुंभमेळा भरतो. यावर्षी मांड उत्सवाची तारीख निश्चित करण्यासाठी पेंडुर गावातील बारा-पाच मानकरी, गावकर मंडळी, देवस्थान ट्रस्ट कमिटीचे सर्व सदस्य, गावातील ग्रामस्थ या सर्वांनी मंदिरात एकत्र येऊन बैठक घेतली व देवाला सांगणे करून देवाच्या परवानगीने १० जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. यावर्षीचा मांड उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे, तसे नियोजनही सुरू आहे. या १४ दिवसांच्या कालावधीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. राज्यात आणि राज्याबाहेरही प्रसिद्ध असलेल्या मांड उत्सवास जास्तीत जास्त भाविकांनी भेट देऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.’

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!