कुडाळकोकणमहाराष्ट्र

वेंगुर्ल्याचा बेपत्ता युवक पुणे येथे सापडला

*🛑वेंगुर्ल्याचा बेपत्ता युवक पुणे येथे सापडला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२५:-* कुडाळ रेल्वेस्थानक येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला रोहन अरुण कैरकर (२४, रा. उभादांडा- वेंगुर्ले) हा युवक पुणे येथे सापडला. कुडाळ पोलिसांनी त्याला पुणे येथे जाऊन ताब्यात घेतले. रविवारी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रोहन हा मनोरुग्ण असून त्याची आई अनिता केरकर या त्याला रत्नागिरी येथे उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. १९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथून रेल्वेने कुडाळ रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याची आई अनिता यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हवालदार मंगेश शिंगाडे तपास करीत होते. रोहनचा शोध सुरू असताना तो दापोडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय) हद्दीत रस्त्यावर फिरताना तेथील पोलिसांना सापडला. चौकशीअंती तो युवक कुडाळ येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तेथील पोलिसांनी कुडाळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार हवालदार मंगेश शिंगाडे, हवालदार सचिन गवस व हवालदार समीर बांदेकर आदींचे पथक दापोडी पोलीस ठाणे येथे गेले. त्या पोलिसांकडून त्याला ताब्यात घेत कुडाळ येथे आणले आणि रविवारी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. रत्नागिरी येथे उपचार करून रोहन आपल्या आईसोबत रेल्वेने कुडाळ स्थानकावर यायला निघाला. येथील रेल्वेस्थानकावर त्याची आई रेल्वेतून उतरली. मात्र, गर्दीत तो येथे उतरलाच नाही. तो त्याच रेल्वेने तसाच मडगाव-गोवा येथे पोहोचला. मडगाव रेल्वेस्थानकावरून तो पुणे येथे जाणाऱ्या एका रेल्वेत बसला व पुणे येथे पोहोचला. तेथे फिरताना पुणे पोलिसांना सापडला होता, असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!