कोकणमहाराष्ट्र

दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

*🛑दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा*

*🛑तुमच्या संघासाठी तुमचे 100% द्या. ख्रिस्टन रॉड्रिक्स*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबत खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो,भरपूर खेळा व आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा.तुम्हाला जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठायची असेल तर लहानपणापासूनच खेळ खेळा.तुमची चिकाटी,सातत्य,प्रयत्न, जिद्द कायम ठेवा.संघामधून खेळत असाल तर हार जीत याचा विचार न करता तुमच्या संघासाठी तुमचे 100% पणाला लावा.’ असे विचार यावेळी ख्रिस्टन रोड्रीग्स त्यांनी बोलताना व्यक्त केले. प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गुरुवार व शुक्रवार दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिव्य ज्योती स्कूल डेगवे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतील विजेते तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स चे कोच ख्रिस्टन रोड्रीग्स,कुडाळ येथील हेड सर्जन डॉ. प्रमोद वालावलकर, फुटबॉल असोसिएशन क्लबचे हेड जयंतराव चामणकर,प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन तसेच मॅनेजर फादर लीजो आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या गटानुसार संचलन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी लांब उडी,उंच उडी,थाळीफेक,भालाफेक,गोळा फेक अशा वैयक्तिक खेळांत त्याचप्रमाणे हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,फुटबॉल,रस्सी खेच,पासिंग द बॉल असे अनेक सांघिक खेळांत आपले कौशल्य दाखवले.
त्याचप्रमाणे संगीत खुर्ची,बमबार्डींग द सिटी,ट्रेजर हंट यांसारखे गमतीशीर खेळही घेण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.मृदुला सावंत तर आभार प्रदर्शन कु.श्रेया दळवी यांनी केले.दिव्य ज्योती प्रशालीचा दोन दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले योगदान दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!