देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव २३ रोजी.
*🛑देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव २३ रोजी.*
*🛑हरीनाम सप्ताह २६ नोव्हेंबर रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि-१८नोव्हेंबर :-*
देवसू गावचे ग्रामदैवत श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शेंडोबा माऊली देवसूसह केसरी आणि दाणोली या तीन गावांचे एकत्रित देवस्थान आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शेंडोबा माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या दिवशी देवसू दानोली व केसरी गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.
यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन या तीनही गावच्या मानकरी आणि देवसू ग्रामस्थांनी केले आहे.
२६ रोजी हरीनाम सप्ताह
यानिमित्त मंदिरात मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात प्रहाराच्या हरीनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिवशी देवसू परिसरातील भजनी मंडळे आपली सेवा शेंडोबा माऊली चरणी अर्पण करून अखंड जागर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

